मराठी मनोरंजनविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून स्वप्निल जोशींचे नाव घेतले जाते. आपल्या गुड लुक्सने आणि रोमॅंटिक इमेजने त्याने त्याचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. आज स्वप्निल जोशी मराठीमधील टॉपचा आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मराठीसोबतच हिंदी मध्ये देखील त्याने त्याची एक वेगळी ओळख तयार केली आहे. नुकतीच स्वप्निल मुख्य भूमिका साकारत असलेली तू तेव्हा तशी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मागील अनेक महिन्यांपासून त्याची ही मालिका चांगलीच गाजत होती. प्रेक्षकांनी देखील मालिकेला भरभरून प्रेम दिले.
View this post on Instagram
तू तेव्हा तशी मालिकेचा नुकताच शेवटचा भाग प्रदर्शित झाला. याच निमित्ताने स्वप्निलने सोशल मीडियावर एक बिहाइंड द सीन व्हिडीओ शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे. स्वप्निलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “शेवट कधीच सोपा नसतो. या मालिकेतीच शेवटचा सीन आणि शॉट माझ्यासाठी माझ्या करियरमधील अतिशय अवघड शॉट होता. तांत्रिकरीत्या नाही. तो शॉट देताना आम्हाला संपूर्ण युनिट बघत होते आणि सर्वांच्याच डोळ्यातून पाणी येत होते. येथे तयार झालेली आमची नाती, आमचे अश्रू…आमचे पूर्ण युनिट आणि आमचे झीचे कुटुंब. सर्वांचेच डोळे पाणावलेले होते. आम्ही आमच्या कामाला घरचेच समजून काम करत असतो याचा आम्हाला अभिमान देखील आहे. आम्ही सोबत असतो, हसतो, प्रेम करतो. इथून पुढे जरी आम्ही आमच्या कामात व्यस्त असलो तरी आम्ही कायम या एका कुटुंबाचा भाग असू. रंगदेवता कायम आपल्यावर प्रसन्न राहो! शुभम!”
स्वप्निलची ही पोस्ट चांगलीच गाजत असून, त्यावर प्रेक्षकांनी कमेंट्स करत ते मालिकेला मिस करणार असल्याचे लिहिले आहे. दरम्यान स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेने खूपच लोकप्रियता मिळवली. प्रेमाला वयाचे बंधन नसते याच ओळीवर मालिकेची कथा होती. या मालिकेत अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, रुमानी खरे, स्वानंद केतकर, सुहास जोशी, उज्वला जोग, सुनील गोडबोले आदी अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?