बोल्ड, ब्युटीफुल अँड बिनधास्त सई, नवीन फोटोंनी चोरले चाहत्यांचे मन


सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अनेक चित्रपटात काम करून तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. ‘दुनियादारी‘ या चित्रपटातील ‘बच्चू आहेस तू’ तिच्या या डायलॉगने तर आख्ख्या महहराष्ट्राला वेड लावले होते. तिच्या करिअरमध्ये तिने अनेक भूमिका निभावल्या आहेत. तिच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला तिने न्याय दिला आहे. सई ही अत्यंत स्टायलिश अभिनेत्री आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच चाहत्यांना भुरळ घालणारा तिचा एक लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.

सईने नुकतेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, तिने काळ्या रंगाचा सुंदर असा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यासोबत तिने गळ्यात डायमंडचा नेकलेस घातला आहे. तसेच केसांची पोनीटेल घातली आहे आणि आय मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज सगळयांना खूप आवडला आहे. अनेक कलाकार देखील या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. (sai tamhankar share her bold photos on social media)

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटांमधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. सोबतत टेलिव्हिजनवर देखील काम केले आहे. तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निपरीक्षा’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत खूप वेगाने भरारी घेतली.

तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

हेही वाचा :

 ‘बिग बॉस मराठी’चा उपविजेता जय दुधानेच्या घरी झाले त्याचे दणक्यात स्वागत, व्हिडिओ आला समोर

फार्महाऊसपासून प्रायव्हेट योर्टपर्यंत, सलमान खान आहे ‘या’ लक्झरी वस्तूंचा मालक, पाहा यादी

अनुष्का शर्माने फिटनेसवर लक्ष देण्यास केली सुरुवात, वर्कआऊट करतानाचे फोटो केले शेअर

 


Latest Post

error: Content is protected !!