कबीर बेदी (Kabir Bedi) यांनी सांगितलं की त्यांनी रेखासोबत ‘खून भरी मांग’ (Khoon Bhari Maang) मध्ये काम केलं आहे. ते म्हणाले की रेखा खूपच शांत आणि खासगी स्वभावाची आहेत,आणि म्हणूनच ते त्यांचा आदर करतात.
अभिनेता कबीर बेदी म्हणाले की,त्यांनी रेखासोबत ‘खून भरी मांग’ या चित्रपटात काम केलं होतं. जेव्हा त्यांना या चित्रपटाचं काम मिळालं, तेव्हा त्यांना कळलं की रेखा ही हिरोईन असणार आहे, आणि हे ऐकताच त्यांनी लगेच होकार दिला. त्यांनी असंही सांगितलं की,रेखा खूपच खाजगी स्वभावाची आणि भावूक (सेंसिटिव्ह) आहेत. रेखासोबत काम करण्याचा अनुभवही त्यांनी शेअर केला.
कबीर बेदी म्हणाले,“मी तेव्हा हवाईमध्ये ‘मॅग्नम पाई’ नावाच्या सीरिजचं शूट करत होतो. तेव्हा राकेश रोशन यांचा मला फोन आला. त्यांनी मला त्यांच्या चित्रपटात हिरोचा रोल ऑफर केला. मी विचारलं,‘माझीच निवड का केली?’ तेव्हा ते म्हणाले,‘या चित्रपटात हिरोच नंतर खलनायक (विलन) बनतो,आणि बाकी कोणीही असा रोल करायला तयार नव्हता.’” कबीर बेदी म्हणाले,“जसं राकेश रोशन यांनी सांगितलं की,या चित्रपटात रेखा हिरोईन आहे, तसं मी लगेच होकार दिला. त्या काळात रेखासोबत काम करणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि सन्मानाची गोष्ट होती.”
रेखाच्या स्वभावाबद्दल बोलताना ते म्हणाले,“रेखा या खूपच खासगी स्वभावाच्या आहेत. त्या स्वतःच्या आयुष्याबद्दल फारच सतर्क असतात आणि ती गोष्ट कोणालाही सहज उघड करत नाहीत. त्या खूप भावूक आहेत,आणि मला वाटतं की त्या दुखावल्या जाऊ नयेत म्हणून स्वतःला जपून ठेवतात. मी त्यांच्या या स्वभावाचा आदर करतो.”
‘खून भरी मांग’चे अभिनेता कबीर बेदी म्हणाले,“आजही जेव्हा आमची भेट होते,तेव्हा आम्ही खूप प्रेमानं भेटतो. मी तिला मिठी मारतो, तिचे आभार मानतो,कारण ती मला खूप आवडते. पण असं नाही की आम्ही एकत्र बसून गप्पा मारतो किंवा वेळ घालवतो. कारण रेखा खूपच खाजगी स्वभावाची आहेत आणि त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगायला आवडतं. आणि त्या गोष्टीचा आदर करणं महत्त्वाचं आहे. कामाच्या वेळीही त्या अशाच होत्या, सेटवर खूप छान वागायच्या,बोलायच्या, पण काम संपलं की फारसं बोलणं किंवा भेटणं नसायचं”.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
उदयपुर फाईल्सचे प्रदर्शन पुन्हा अडकले; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत निर्माते…