Thursday, July 3, 2025
Home टेलिव्हिजन “टीव्हीवर काम केलं, पण पैसे मिळाले नाहीत – पूनम ढिल्लो यांचा गंभीर आराेप”

“टीव्हीवर काम केलं, पण पैसे मिळाले नाहीत – पूनम ढिल्लो यांचा गंभीर आराेप”

पूनम ढिल्लो (Poonam Dhillon) म्हणाल्या की, टीव्हीवर थोडा काळ काम करणाऱ्या कलाकारांना कुठलाच करार दिला जात नाही. त्यामुळे त्यांना पैसे मिळायला खूप वेळ लागतो, कधी कधी महिनोंमहिने वाट बघावी लागते.

ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी नुकतंच सांगितलं की, टीव्ही इंडस्ट्रीत छोटे रोल करणाऱ्या कलाकारांना पैसे वेळेवर मिळत नाहीत. मोठ्या कलाकारांना तर सगळी फी वेळेवर मिळते, पण छोटे कलाकार मात्र महिनोंमहिने पैसे येण्याची वाट पाहत असतात. कारण असं की, अशा कलाकारांकडे कोणताही ठरलेला करार (कॉन्ट्रॅक्ट) नसतो.

न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना CINTAA (सिने अ‍ॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट्स असोसिएशन) च्या अध्यक्ष पूनम ढिल्लो म्हणाल्या, “आजकाल टीव्ही कलाकारांना पैसे मिळायला किमान 90 दिवस लागतात. मी अशा छोट्या कलाकारांविषयी बोलतेय जे दररोज थोडेफार पैसे कमावतात आणि महिन्यात दोन-तीन दिवसचं काम मिळतं.”

पूनम ढिल्लो पुढे म्हणाल्या, “मी त्या मोठ्या स्टार्सबद्दल बोलत नाहीये जे लाखो-कोटी कमावतात. त्यांना कॉन्ट्रॅक्टमुळे सगळे पैसे वेळेवर मिळतात. पेमेंट न मिळालं तर ते शूटिंगलाही येत नाहीत. पण जे छोटे कलाकार असतात, जसं की ड्रायव्हर, वेटर, वकील, डॉक्टर यांसारखे रोल करणारे, जे फक्त एका दिवसासाठी शूट करतात, त्यांना मात्र पैसे मिळायला तीन महिने लागतात. अशा लोकांकडे घर असतं, कुटुंब असतं, मुलं असतात, बिलं भरायची असतात आणि रोजचं घरखर्च चालवायचा असतो.”

ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो पुढे म्हणाल्या, “मी सगळ्या कलाकारांविषयी किंवा मोठ्या स्टार्सबद्दल बोलत नाहीये. त्यांच्याकडे वकील असतो, गरज पडली तर ते कोर्टातही जाऊ शकतात. पण छोटे कलाकार इतके लकी नसतात, त्यांच्याकडे ना कॉन्ट्रॅक्ट असतो, ना कोणतीच कायदेशीर मदत. पूर्वी त्यांना ट्रान्सपोर्टसाठी 300 रुपये मिळायचे, आता ते 500 रुपये मागतात, तरी त्यांना काहीच मिळत नाही. त्यांच्याकडून अशा ठिकाणी जायची अपेक्षा केली जाते जी दोन तास लांब असते, पण ट्रान्सपोर्टसाठी एक पैसाही दिला जात नाही.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

93 लाखांचा फ्लॅट आणि एक मुलगी – डीलच्या गाेष्टी समाेर

हे देखील वाचा