Wednesday, July 3, 2024

लाल रंगात खुलले प्रियांकाचे सौंदर्य, देसी गर्लने केले मुलगी मालतीसोबत पहिले फोटोशूट फोटो व्हायरल

काही महिन्यांपूर्वीच प्रियांका चोप्राने ती आई झाल्याचे जाहीर केले. सरोगसीचा माध्यमातून प्रियांका आई झाली. प्रियांकाने तिच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास असे ठेवले असून, ती तिचा जास्तीत जास्त वेळ मालतीसोबत घालवताना दिसते. सध्या प्रियांका आणि मालती चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे प्रियांका आणि मालतीचे एकत्र फोटोशूट. नुकतेच प्रियांकाने तिच्या लेकीसोबत पहिल्यांदाच फोटोशूट केले आहे. या शूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

प्रियांकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या आणि मालतीच्या पहिल्या फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये पाहिले तर प्रियांकाने खाली बसून पोज देताना दिसत असून तिच्या जवळ मालती देखील बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये बॅकग्राऊंड, प्रियांका आणि मालतीचा ड्रेस सर्वच लाल रंगात आहे. प्रियांका नेहमीप्रमाणे या फोटोशूटमध्ये स्टनिंग आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोशूटमध्ये मात्र प्रियांकाने मालतीचा चेहरा दाखवलेला नाही. प्रियांकाने मालतीचा चेहरा तिच्याकडे केलेला असून, फोटो काढताना मालती पाठमोरी दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

सध्या प्रियांकाच्या या पोस्टवर एकापेक्षा एक मस्त कमेंट्स येत असून, अनेकांनी त्यांच्या फोटोचे कौतुक केले आहे, तर काहींनी प्रियांकाला मालतीचा चेहरा दाखवण्याची विनंती केली आहे. मात्र प्रियांका मालतीचा चेहरा कधी दाखवणार याबाबत अजून कोणतीच माहिती नाही. तत्पूर्वी प्रियांका आणि निक नेहमीच मालतीसोबतचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती लवकरच बॉलिवूडमध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’मध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत कॅटरिना आणि आलिया भट्ट असतील. याशिवाय ती हॉलिवूडमध्ये ‘लव अगेन एंड एंडिंग थिंग्स’मध्ये दिसेल. ती यावर्षी तिचे वेबसिरीजमध्ये पदार्पण करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हंसिका मोटवानीच्या लग्नावर येतोय नवीन शो, ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
आरोह वेलणकरने पोस्ट शेअर करत बिग बॉसमधल्या ‘त्या’ अनुभवांबद्दल व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा