पुणे ११ ऑगस्ट २०२२ : सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केले आहे. नाथसंप्रदाय आणि त्याविषयीची माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ यांसारख्या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य प्रेक्षकांना समजतं आहे. या मालिकेनी बघताबघता एका वर्षाचा यशस्वी टप्पा नुकताच गाठला आहे. ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतले कलाकार अभिनेते जयेश शेवलकर, सुश्रुत मुळावेकर यांनी सासवड येथील कानिफनाथ मंदिराला भेट दिली. कानिफनाथ मंदिरात दर्शन घेऊन प्रसन्न वाटल्याचे आणि आता जोमाने काम करण्यासाठी नवीन आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे दोन्ही कलाकरांनी सांगितले.
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘गाथा नवनाथांची’ या मालिकचे नाव घेतले जाते. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती असं सगळं मालिकेत बघायला मिळालं आहे. मालिकेत याहीपुढे नाथांचे वेगवेगळे चमत्कार बघायला मिळतील. रेवणनाथांचा नाथपंथाच्या दीक्षेकडचा प्रवास तसेच रेवणनाथ आणि श्रीमच्छिन्द्रनाथ यांची भेट असे काही महत्त्वाचे प्रसंग मालिकेच्या आगामी भागांत बघायला मिळणार आहेत.
नाथ संप्रदायाची परंपरा आणि माहिती या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळते आहे. मालिकेत पुढे कोणते चमत्कार दिसणार, अशुभ शक्तींचा नाश नाथ कसा करणार हे जाणून घेण्यासाठी पाहा, ‘गाथा नवनाथांची’, सोम. ते शनि., संध्या. ६:३० वा. आपल्या सोनी मराठीवर वाहिनीवर. या मालिकेची प्रेक्षकांमध्ये जोरदार प्रसिद्धी असून, घराघरात ही मालिका मोठ्या भक्तीभावाने पाहिले जाते.