अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांत दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनार आहे. लग्नाच्या बातम्यांमुळे दोघेही सतत चर्चेत असतात. ट्विटर असो किंवा फेसबुकवर, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सगळीकडेच ट्रेडिंग आहेत. दरम्यान, आलिया भट्टचा 10 वर्ष जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा तिने रणबीर कपूरबद्दल आपले मत सांगितले. करण जोहरच्या (Karan Johar) ‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून पदार्पण केलेल्या आलिया भट्टने, प्रमोशन दरम्यान रणबीर कपूरला तिचा क्रश म्हटले होते. इतकेच नव्हे, तर तिला तो कसा आणि का आवडला हे देखील तिने सांगितले होते.
‘स्टुडंट ऑफ द इयर’ या पदार्पण चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आलिया भट्ट म्हणाली होती, “होय, मी रणबीर कपूरवर प्रेम करते आणि बर्फी पाहिल्यानंतर मी आणखी जास्त करायला लागले. तो माझा क्रश आहे आणि नेहमीच माझा क्रश राहिल.” असे आलिया भट्टने 10 वर्षांपूर्वी सांगितले होते. त्यावेळी रणबीर आणि आलियाचे आयुष्य पूर्णपणे वेगळे होते. त्यावेळी रणबीर कपूरचे नाव कॅटरिना कैफसोबत जोडले गेले होते. (10 years ago alia bhatt reveal why ranbir kapoor is her crush)
Dreams do come true!#AliaBhatt really appears to have manifested her romance with #RanbirKapoor. ❤️ pic.twitter.com/51fJIQaLdc
— Filmfare (@filmfare) April 8, 2022
कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर 2010 मध्ये प्रकाश झा यांच्या ‘राजनीति’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले. मात्र जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.
साल 2018मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या शूटिंगमधून दोघांची जवळीक वाढली आणि तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. लवकरच दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दोघांचे चाहते या जोडीला भरभरून प्रेम देत आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल
‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला