Tuesday, March 17, 2026
Home बॉलीवूड राज कुंद्राला मुख्य आरोपी ठरवणाऱ्या त्याच्या विरोधातील १५०० पानांच्या चार्जशीटमध्ये नक्की आहे तरी काय?

राज कुंद्राला मुख्य आरोपी ठरवणाऱ्या त्याच्या विरोधातील १५०० पानांच्या चार्जशीटमध्ये नक्की आहे तरी काय?

 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलै रोजी अटक केली. अश्लील चित्रपट बनवून ते विकल्या प्रकरणी त्याच्यावर कारवाई सुरू आहे. त्याचे हे प्रकरण समोर आल्या नंतर शिल्पासोबतच बॉलिवूड आणि उद्योगजगाला मोठा धक्का बसला. राजवर अश्लील चित्रपट तयार करणे आणि विकणे या संदर्भात चार्जशीट देखील दाखल केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने कोर्टासमोर दाखल केलेली राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थोर्प यांच्या विरोधातील चार्जशीट तब्बल १५०० पानांची आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी एप्रिलमध्ये ९ जणांन विरोधात चार्जशीट दाखल केली होती. तसेच अश्लील चित्रपट प्रकरणी सध्या अनेक अभिनेत्रींची चौकशी सुरू आहे. काही अभिनेत्री राज कुंद्राविरोधात अधिक गंभीर आरोप लावताना देखील दिसत आहेत.

अश्लिल चित्रपट बनवणारे रॅकेट आणि त्याच्या मागील मास्टरमाइंडला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक व्यक्तींची चौकशी केली होती. यादरम्यान त्यांनी अंधेरीमध्ये असलेल्या राज कुंद्राच्या कार्यालयावर धाड टाकली होती. तेव्हा पोलिसांनी त्याच्या कार्यालयामधून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चित्रपट एकत्र ठेवण्याचे डिव्हाईज आणि अश्लील चित्रपटांसंबंधीच्या काही क्लिप्स सापडल्या आणि त्यांनी त्या जप्त केल्या होत्या. या सर्वांच्या आधारेच त्याला १९ जुलैला अटक झाली.

Photo Courtesy: Instagram/rajkundra9

मुंबई गुन्हे शाखेने चार्जशीटमध्ये आणखीन दोन फरारी गुन्हेगारांची नावे जोडली आहेत. यामध्ये पहिले नाव यश ठाकुर उर्फ अरविंद श्रीवास्तवचे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो सिंगापूरमध्ये राहतो. दुसरे नाव हे आहे राज कुंद्राचा मेहुणा असलेल्या प्रदीप बख्शीचे. सध्या तो लंडनला राहतो.

या प्रकरणी तनवीर हाशमीला देखील अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशी दरम्यान यश ठाकूरचे नाव समोर आले. पोलिसांना यश ठाकूर आणि तनवीर हाशमीच्या बँकेच्या व्यवहारांची माहिती मिळवली आणि यशवर अश्लील सामग्री उपलब्ध करून दिल्याचे आरोप केले आहेत.

Photo Courtesy: Instagram/rajkundra9

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार अशी माहिती समोर आली आहे की, हे चित्रपट ‘हॉटशॉट’ या अँपवर विकले जात होते. तसेच आतापर्यंत हे चित्रपट विकून १.१७ कोटींची कमाई करण्यात आली आहे. ही कमाई ऑगस्ट २०२० पासून ते डिसेंबर २०२० पर्यंतच्या फक्त ५ महिन्यांमध्ये केली गेली होती.

राज कुंद्राच्या आयुष्यात सुरू असलेल्या या सर्व गोष्टींचा शिल्पा शेट्टीच्या मुलांवर काही गंभीर परिणाम होऊ नये यासाठी ती स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. यंदाचा गणेशउत्सव देखील तिने आपल्या मुलांसह धुमधडाक्यात साजरा केला. गणेशउत्सवादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा