Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड केजीएफ २ | १९ वर्षाच्या मुलाने केली ३०० कोटीच्या चित्रपटाची एडिटींग, टॅलेंट पाहून हैराण झाले लोक

केजीएफ २ | १९ वर्षाच्या मुलाने केली ३०० कोटीच्या चित्रपटाची एडिटींग, टॅलेंट पाहून हैराण झाले लोक

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सुपरस्टार यश स्टारर चित्रपट ‘KGF 2’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आणि अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

KGF बद्दल प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे, तर KGF ने यशला रातोरात सुपरस्टार बनवले. KGF हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून चाहते ‘KGF २’ ची वाट पाहत होते, कोरोनामुळे रिलीज होण्यास थोडा विलंब झाला होता पण शेवटी चित्रपट थिएटरमध्ये पोहोचला.

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, त्याची क्रेझ देखील प्रेक्षकांमध्ये KGF सारखीच आहे आणि दुसऱ्या भागानेही चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटाचे संवाद, अॅक्शन आणि पात्रे सशक्त आहेत. त्यामुळे या चित्रपटात आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि ते म्हणजे एडिटिंग.

चित्रपटात जबरदस्त एडिटिंग करण्यात आले आहे. त्याचवेळी यासंदर्भातील एक रंजक माहिती समोर येत आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रशांत नील यांनी १९ वर्षांच्या मुलाकडे चित्रपटाच्या संपादनाचे काम सोपवले होते, प्रशांतला उज्ज्वल कुलकर्णीचे काम इतके आवडले की त्याने त्याच्याकडे ३०० कोटी बजेटच्या चित्रपटाच्या संपादनाची जबाबदारी दिली

उज्ज्वलने त्याच्या एडिटिंगने दिग्दर्शक किंवा चाहत्यांना निराश केले नाही आणि चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण त्याचे कौतुक करताना दिसत आहे. एवढ्या लहान वयात उज्ज्वलने मोठे पद मिळवले आहे. या चित्रपटात यशशिवाय संजय दत्त, रवीना टंडन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे आता उज्ज्वल प्रकाशझोतात आला आहे. अनेक्कन आता तो मुलगा नक्की कोण आहे हे पाहण्याचो उत्सुकता लागली आहे. एवढ्या कमी वयात त्याने हे काम केल्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा