Tuesday, December 23, 2025
Home मराठी ‘तू तो जेल मैं ही सडेगा’ म्हणत ‘या’ टीव्ही अभिनेत्रीने केले दिव्याच्या पतीवर गंभीर आरोप

‘तू तो जेल मैं ही सडेगा’ म्हणत ‘या’ टीव्ही अभिनेत्रीने केले दिव्याच्या पतीवर गंभीर आरोप

सोमवारी ७ डिसेंबरला टीव्ही अभिनेत्री दिव्या भटनागरचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून दिव्या कोरोना वायरसवर इलाज घेत होती. व्हेंटिलेटरवर असलेली दिव्या अखेरीस हे जग सोडून गेली. दिव्याच्या निधनाने दिव्याची मैत्रीण टीव्ही अभिनेत्री देबोलीना भटाचार्याने सोशल मीडियावर वे व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये देबोलीनाने तिच्यावर दिव्याचा जाण्याचा खूप खोलवर परिणाम झाला असल्याचे सांगत, दिव्याच्या पतीवर अनेक आरोप केले आहेत.

देबोलिनाने तिच्या व्हिडिओमध्ये दिव्या आणि तिचे नाते किती चांगले आणि जुने होते हे सांगितले. देबोलीना सांगते, “दिव्याने कोरोनामुळे शारीरिक त्रास तर सहन केला पण ती मानसिक त्रास देखील मागील अनेक महिन्यांपासून सहन करत होती. देबोलिनाने दिव्याच्या पतीवर गगन गबरूवर अनेक आरोप लावले आहे. सात मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दबोलीनाने सांगितले, ” मागच्या अनेक महिन्यांपासून दिव्या मोठ्या मानसिक त्रासामधून जात होती. दिव्याच्या मानसिक त्रासाला फक्त गगन जबाबदार आहे. दिव्या खूप चांगली आणि खूप जास्त भावनिक होती.”

गगनवर आरोप करताना देबोलीना पुढे म्हणते, “दिव्याने काही दिवसांपूर्वी ओशिवरा पोलीस ठाण्यात गगन विरोधात NC दाखल केले आहे. एवढेच नाही तर कारवाचौथच्या दिवशी गगनने दिव्यचे दागिने चोरून तिला मारपीट सुद्धा केली. दिव्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे खूप टेन्शन मध्ये असायची. माझ्याकडे गगनविरुद्ध पुरवले आहेत त्यामुळेच मी त्याच्यावर हे आरोप करत आहे. आता गगन तू आणि तुझी आई जेल मधेच सडणार.’
देबोलीनाच्या या व्हिडिओमधून सहज समजते की, दिव्याच्या मृत्यूमुळे देबोलीना किती दुःखी झाली आहे.

हे देखील वाचा