Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग बॉसचा माजी कंटेस्टेंट हिंदुस्तानी भाऊच्या आईचं निधन; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

‘बिग बॉस’ आपल्या १४ व्या सिझनमधील स्पर्धकांमुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. परंतु बिग बॉसच्या १३ व्या सिझनच्या एका स्पर्धकावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरं तर बिग बॉस १३ सिझनचा भाग राहिलेला यूट्यूबर हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठकच्या आईचे निधन झाले आहे. यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा परसली.

हिंदुस्तानी भाऊची आई मागील काही दिवसांपासून आजारी होती. त्यामुळे त्यांचे निधन झाले. आपल्या आईच्या खराब आरोग्याविषयीची माहिती स्वत: हिंदुस्तानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली होती. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर आईसोबतच फोटो टाकला होता.

त्याला कॅप्शन देत त्याने लिहिले होते की, “माझी आई लवकर बरी व्हावी यासाठी कृपया प्रार्थना करा.”

काही महिन्यांपूर्वी हिंदुस्तानी भाऊने एकता कपूरविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्याने आरोप केला होता की, एकताने आपल्या अल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये भारतीय सैनिकांचा अपमान केला होता. सोबतच ते चुकीच्या पद्धतीने दाखवले होते.

याबाबत सोशल मीडियावरही चर्चेला उधान आले होते. चाहत्यांनी एकता कपूरला भारतीय सैनिकांची माफी मागण्याबद्दलही म्हटले होते. यानंतर एकतानेही त्या सीनसाठी दु:ख व्यक्त केले आणि वेब सीरिजमधून ते हटवण्यात आले.

हे देखील वाचा