बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता अभिषेक बच्चन जून २०२१मध्ये आपल्या बॉलीवूडमधील कारकिर्दीची २१ वर्ष पुर्ण करणार आहे. २००२ साली रेफ्यूजी चित्रपटातून पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने गेल्या २० वर्षात ६६हून अधिक सिनेमे व एका वेबसिरीजमध्ये काम केले आहे. एवढी मोठी कारकिर्द व एवढ्या मोठ्या प्रमाणात चित्रपटांत काम करुनही अभिषेक कधी बॉलीवूडच्या टॉप १० अभिनेत्यांमध्ये राहिला नाही. २०१४नंतर तो फारसा चित्रपटांत दिसतही नाही. असे असले तरी आता मात्र अभिषेकच्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. ज्युनीयर बच्चन लवकरच मुख्यमंत्री होणार आहे. आहो खरे खुरे मुख्यमंत्री नाही, सिनेमातील रिल लाईफ मुख्यमंत्री…
५ फेब्रुवारी रोजी आपला ४५वा वाढदिवस साजरा केलेला अभिषेक सध्या काहीतरी नविन करण्याचा विचार करत आहे. मागच्या चुका सुधारुन तो प्रेक्षकांसमोर नविन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
अभिषेकला तुम्ही अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिले आहेच, परंतु राजकारणात अभिषेक कसा दिसेल याचा कोणी विचार केलाय का? त्याला राजकारणातील भूमिका पार पाडता येईल का? की तिथेही अभिषेकला कठोर परिश्रम करावे लागतील? तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला लवकरच मिळणार आहेत, जेव्हा अभिषेक मुख्यमंत्री बनेल.
कारकिर्दीत अनेक उतार-चढाव बघितल्यानंतर अभिषेकने त्याच्या येणाऱ्या चित्रपटात खूपच मेहनतीने आणि मनापासून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या येणाऱ्या ‘दसवी’ चित्रपटात अभिषेक एका भ्रष्ट मुखमंत्र्याची भूमिका निभावणार आहे.
‘तुषार जाटोला’ यांनी दिग्दर्शित केलेला अभिषेक बच्चनचा हा चित्रपट पूर्णपणे राजकारणावर आधारित असणार आहे. या चित्रपटात अभिषेक दहावी नापास मुखमंत्र्याच पात्र निभावणार आहे. या चित्रपटाद्वारे शिक्षणाचं महत्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न तो करणार आहे.
‘नेत्यांना देखील शिक्षणाची गरज असते. त्यांनी देखील उच्च शिक्षण घेतले पाहिजे,’ असा संदेश या चित्रपटमार्फत दिला जाणार आहे. या चित्रपटाची शूटिंग दिल्ली आणि आग्रा या ठिकाणी होणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन सोबत ‘यामी गौतमी’ सुद्धा असणार आहे. ‘दसवी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये जबरदस्त कमबॅक करायला अभिषेक पूर्णपणे तयार आहेत.
हेही वाचा-
–अभिषेकच्या वाढदिवशी अमिताभ बच्चन झाले भावूक; जुने फोटो शेअर करत दिल्या हटके शुभेच्छा!
–हॅपी बर्थडे! जन्म दाखल्यावर बाबा बच्चन असं नावं असणारा अभिषेक बनणार होता एलआयसी एजंट, वाचा ज्युनियर बच्चनचा जीवन प्रवास
–शूटिंगवेळी वहीदा यांनी खरंच मारली होती अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली, वाचा काय होती बिग बींची प्रतिक्रिया










