न्यूड फोटोनंतर वनिताचे नाव पुन्ही चर्चेत, सोशल मीडियावर व्हायरल होतोय ‘हा’ फोटो


काही दिवसांपूर्वी अभिनेत्री वनिता खरात तिच्या न्यूड फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली होती. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तिने तिचा न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो तुफान वायरल झाला. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स दिल्या. त्यात काही सकारत्मक तर काही नकारात्मक अशा दोन्ही कमेंट होत्या.

हा फोटो पोस्ट करण्यामागचा वनिताचा एकच विचार होता की, कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःला स्वीकारा ह्या फोटोसोबत तिने एक मेसेजही लिहिला होता, त्यात तिने म्हटले होते की, ” मला माझ्या प्रतिभेचा, आवडीचा आणि आत्मविश्वासाचा प्रचंड अभिमान आहे. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे…कारण मी ‘मी’ आहे.”

आता वनिताने तिचा नवीन एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. तिचा फोटो देखील खूप लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत ती ब्लॅक कलरच्या टीशर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसत आहे. मात्र सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते तिच्या टी शर्ट लिहिलेल्या तीन शब्दांनी ‘खड्यात गेलं सगळं’. सोबतच वर बारीक अक्षरात लिहिले आहे यशाची सुरुवात आणि खाली लिहिले ‘खड्यात गेलं सगळं’. तिच्या या फोटोमागे भिंतीवर तिचाच न्यूड फोटो देखील लावलेला दिसत आहे. या फोटोमध्ये वनिता प्रचंड कॉन्फिडन्ट दिसत आहे.

वनिताच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. फॅन्ससोबतच कलाकार देखील वनिताच्या या नव्या फोटोवर कमेंट्स करत आहे. वनिता नेहमी सांगते की, दुसऱ्यांपेक्षा तुम्ही स्वतः स्वीकारण्याची जास्त गरज असते.

दरम्यान वनिताने शाहिद कपूरच्या गाजलेल्या ‘कबीरसिंग’ सिनेमात मोलकरणीची भूमिका साकारली होती. वनिता या सिनेमात खूप कमी दिसली असली तरी ‘तिच्याकडून ग्लास फुटतो आणि शाहिद तिच्यामागे जोरात पाळतो.’ तिचा हा एक सीन जबरदस्त हिट झाला होता. वनिता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात महाराष्ट्राला हसवताना दिसत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.