सत्तर ते ऐंशीच्या दशकापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिलेली या काळातील एक कर्तृत्ववान महिला लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे सई परांजपे. नुकताच त्यांनी आपला 83 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची आठवण काढत एक ट्वीट देखील केले आहे. यात तिने त्यांचे काही फोटो ट्विटरवर पोस्ट करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सई परांजपे यांचे फोटो शेअर करत कंगनाने लिहिले आहे की, “चित्रपटातील अनेक असे स्टार्स आहेत, ज्यांना सगळे खूप पटकन विसरून जातात. आज त्यातील एक महिला नायिका, पहिली महिला लेखिका आणि दिग्दर्शक सई परांजपे यांचा वाढदिवस आहे. ज्यांनी स्पर्श आणि चष्मे बहाद्दुर यासारखे असामान्य चित्रपट बनवले. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम.”
https://twitter.com/KanganaTeam/status/1372771133309681676
सई परांजपे यांचा जन्म 19 मार्च 1938 मध्ये मुंबई येथे झाला होता. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच एक पुस्तक लिहिले होते. त्यांचे वडील एक वॉलपेंटर आर्टिस्ट होतें, तर आई अभिनेत्री होती. त्यांचे वडील रूशी (रशियन), तर आई भारतीय होती.
‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटासोबतच सई परांजपे यांनी ‘कथा’, ‘स्पर्श’ आणि ‘दिशा’ हे चित्रपट बनवले. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक पात्र दर्शकांना त्यांच्या आयुष्याचा एक भाग वाटत असे. त्यांना त्यांच्या चित्रपटासाठी चार राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहे. शिवाय दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले आहेत. चित्रपट सृष्टीतील त्यांचे हे योगदान बघून त्यांना 2006 मध्ये सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. मागील काही दिवसात सई परांजपे यांनी एक पुस्तक लिहिले होते. ज्याचं नाव ‘ए पॅचवर्क क्विल्ट’ हे होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड
-सपना चौधरीला टक्कर देत, हरियाणवी गायिका रेणुका पंवार घेऊन आली नवं गाणं! पाहा व्हिडिओ