जेव्हा एखादा चित्रपट तयार होतो तेव्हा तो सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला जातो. मंडळाचे सदस्य हा चित्रपट पाहतात आणि त्यात काही आक्षेपार्ह दिसत असल्यास निर्मात्यांना ते काढण्यास सांगितलं जातं. येथून हा चित्रपट सिनेमागृहात पोहोचतो. काही वेळा चित्रपटात बरेच बोल्ड सीन्स असतात, त्यावर कात्री लावणे आवश्यक आहे. बर्याच वेळा असं घडतं की हे सीन्स चित्रपटातून कापले जातात पण काही जण मुद्दाम ते सीन लीक देखील करतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचे बोल्ड सीन्स लीक होताच व्हायरल झाले.
माही गिल
एका उत्तम अभिनेत्री माही गिलचाही एक इंटिमेट सीन लीक झाला आणि त्यानंतर तो बराच व्हायरल झाला. माही गिल आणि रणदीप हूडा यांचा ‘साहब बीवी और गँगस्टर’ चित्रपटातील एक सीन कुणीतरी लीक केला. यानंतर चित्रपटाचे आणखी बरेच सीनही लीक झाले. त्यातील एका दृश्यात अभिनेता जिमी शेरगिल देखील होता.
अहाना कुमरा
२०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ चित्रपटामध्ये अहाना कुमराचे अनेक इंटिमेट सीन्स होते. पण कुणीतरी त्यांना सोशल मीडियावर व्हायरल केलं, त्यानंतर यावरून बॉलिवूडमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. काही दिवसांनंतर हा संपूर्ण चित्रपटच कुणीतरी लीक केला होता.
स्वरा भास्कर
‘अनारकली ऑफ आरा’ चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळू शकलं नाही, परंतु एक सिन लीक झाल्यानंतर हा चित्रपट बराच चर्चेत आला. या चित्रपटात स्वरा भास्कर हिने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटात स्वराचा कपडे बदलतानाचा एक सिन होता तो लीक झाला होता. आणि बघता बघता हा सिन सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला होता.
बिदीता बाग
चित्रपट ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बिदिता बाग यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दोघांनी चित्रपटात बरेच इंटीमेट सीनसुद्धा दिले होते. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे बरेच सीन्स लीक झाले त्यानंतर बराच वादंग देखील उठला होता.
नंदना सेन
प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या जीवनावर आधारित ‘रंगरसिया’ चित्रपटात रणदीप हूडा आणि नंदना सेन मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात नंदनाने अनेक बोल्ड सीन्स दिले जे त्यावेळी इंटरनेटवर लीक झाले होते. यामुळे रंगरसिया हा चित्रपट चर्चेचा विषय बनला होता.