Friday, July 5, 2024

विराट आणि अनुष्कासोबतच ‘या’ कलाकारांच्या मुलांची नावंही आहेत चर्चेत, जाणून घ्या ‘वामिका’पासून ‘तैमूर’पर्यंतच्या नावांचा अर्थ

नुकतेच काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी एका गोड मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर आपल्या मुलीचा फोटो शेअर करत अनुष्काने हे देखील सांगितले आहे की, आम्ही तिचं नाव ‘वामिका’ असं ठेवत आहोत. अनुष्काने जेव्हा आपल्या मुलीचं नाव सोशल मीडियावर शेअर केलं, तेव्हापासून हे ट्रेंडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावरून तिचे चाहते या नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत.

अनुष्का शर्मानेही चाहत्यांच्या उत्सुकता अधिक न ताणता सांगितले की, वामिकाचा अर्थ हा ‘दुर्गा’ आहे. दुर्गा मातेच्या एका रूपाला वामिका असे देखील म्हटले जाते. विराट आणि अनुष्का सोबतच असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या मुलांची नावं खूपच वेगळी आणि सुंदर ठेवली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या काही कलाकारांच्या मुलांची नावं.

मिशा
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मिरा राजपूत यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शाहिदने आपल्या मुलीचं नाव ‘मिशा’ अस ठेवलं आहे, जे की शाहिद आणि मीरा यांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन तयार झाले आहे. त्याच्याच मुलाचं नाव ‘जैन’ असं आहे. जैन हा एक अरबी शब्द असून याचा अर्थ ‘सुंदर’ असा होतो.

नुरवी
अभिनेता नील नितीन मुकेश आणि त्याची पत्नी रुक्मिणी यांना एक मुलगी आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव ‘नुरवी’ असं ठेवलं आहे. ज्याचा अर्थ सुगंध असा होतो. नीलचं अस म्हणणं आहे की, त्यांची मुलगी त्यांच्या कुटुंबात एक ‘सुगंध’ घेऊन आली आहे.

तैमूर
बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय बालक म्हणजे ‘तैमूर अली खान’ होय. जेव्हा करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी आपल्या मुलाचं नाव ‘तैमूर’ असं ठेवलं होतं, तेव्हा हे नावं बरंच वादात आलं होतं. या नावाला सोशल मीडियावर खूपच ट्रोल केलं होतं. पण तैमूर या नावाचा अर्थ ‘फौलादी’ असा आहे.

अबराम
तैमूर प्रमाणेच लोकप्रिय असलेले नाव म्हणजे ‘अबराम खान’. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या मुलाच्या नावाचा म्हणजेच अबरामच्या नावाचा अर्थ ‘जेवीस’ आहे, जे भगवान राम याच्याशी जोडलेलं आहे.

आराध्या
बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या मुलीचं नावं देखील खूप चर्चेत आल होतं. त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं ‘आराध्या’ अस ठेवलं आहे. संस्कृतमध्ये याचा अर्थ ‘पूजनीय’ असा आहे.

समीक्षा
बॉलिवूडची सर्वात फीट समजली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही मागच्याच वर्षी पुन्हा एकदा सरोगसीद्वारे‌ आई झाली आहे.

तिने तिच्या मुलीचं नावं ‘समीक्षा’ शेट्टी ठेवलं आहे. तिच्या नावाचा अर्थ ‘लक्ष्मी देवी’ असा होतो.

हेही वाचा-

पडद्यावर माता ‘सीता’ची भुमिका साकारलेल्या ‘या’ ५ अभिनेत्री; प्रेक्षकांच्या मनात आजही आहे आदर

भावा ही नावं पाहिली का.! बॉलिवूडमधील सिनेमांची भन्नाट नावे वाचून तोंडाला येईल पाणी; एकदा वाचाच

प्रेमाला वयाचं बंधन नसतं म्हणे!! १३ वर्षीय मुलीवर जीव जडलेल्या जॅकी श्राॅफ यांनी नंतर ‘असं’ जुळवलं लग्न

हे देखील वाचा