Wednesday, July 3, 2024

श्वास रोखून धरा! ‘भाईजान’ सलमान खानची भाची बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, धर्मेंद्र यांच्या नातवासोबत करणार रोमान्स

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या मुलांची नेहमीच चर्चा सुरू असते. अशातच नुकतेच वृत्त आले की, अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी तयार झाली आहे. परंतु आता यामध्ये आणखी एका अभिनेत्याच्या मुलीची भर पडताना दिसत आहे. सर्वांनाच माहिती आहे की, सुपरस्टार सलमान खानच्या कुटुंबाचे या चंदेरी दुनियेशी खूप जुने नाते आहे. त्याचे वडील सलीम खान यांनी एकापेक्षा एक चित्रपटांच्या कथेची जाणीव चाहत्यांना करून दिली आहे. आता सलमानच्या कुटुंबातील एक सदस्य या चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, सलमान खानची भाची अलीजे अग्निहोत्रीला दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा मुलगा अवनीश बडजात्या चित्रपटसृष्टीमध्ये लाँच करणार आहे.

वृत्तानुसार, अवनीश एक चित्रपट तयार करत आहे, ज्यामध्ये तो अलीजेला मुख्य अभिनेत्री म्हणून घेणार आहे. असे म्हटले जात आहे की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि अभिनेता सनी देओलचा मुलगा राजवीर देओलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

वृत्तांंनुसार, हा रोमान्स- कॉमेडी चित्रपट असणार आहे. अयान मुखर्जी यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ याप्रमाणेच हा चित्रपट असेल. असे असले तरीही, चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अलीजेच्या पदार्पणाचे वृत्त यापूर्वीही आले होते. त्यावेळी असे म्हटले जात होते की, अलीजे जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान जाफरीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. परंतु आता ती राजवीरसोबत पदार्पण करणार आहे.

तसं पाहिलं, तर अलीजे सोशल मीडियावर तितकीशी सक्रिय नाहीये. परंतु तिच्या सुंदरतेच्या चर्चा दूरपर्यंत पसरल्या आहेत. अलीजे अग्निहोत्री ही अभिनेता अतुल अग्निहोत्री आणि अलवीरा यांची मुलगी आहे.

अतुल आपल्या मुलीसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. यासोबतच ते अलीजेला पार्टींमध्येही घेऊन जातात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या भल्यांना रडवणाऱ्या कंगना रणौतला ‘या’ कारणामुळे अश्रू अनावर

-कंगना रणौतच्या ‘थलायवी’चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्रीच्या दणदणीत आवाजाने हबकला प्रेक्षकवर्ग

-प्रसूतीच्या एका महिन्यानंतरच कामावर परतली ‘बेबो!’ ‘पैशांसाठी हे काहीही करतील’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा