एक दु:खद बातमी समोर येत आहे. दिवंगत अभिनेते कादर खान यांचा मोठा मुलगा अब्दुल कुद्दूस याचे कॅनडामध्ये निधन झाले आहे. मात्र, त्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. अब्दुल हा कादर खानच्या पहिल्या पत्नीचा मोठा मुलगा होता. अब्दुल चित्रपटाच्या दुनियेपासून दूर होता. तो आपल्या कुटुंबासमवेत कॅनडामध्ये राहत होता आणि सुरक्षा अधिकारी म्हणून विमानतळावर काम करत होता. अब्दुलच्या मृत्यूची माहिती व्हायरल भयानी या प्रसिद्ध फोटोग्राफरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
अब्दुल कुद्दुस खान याच्यावर टोरंटो येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सन 2018 मध्ये, कादर खान यांचे देखील कॅनडामध्ये वयाच्या 81व्या निधन झाले होते. दोन वर्षांपूर्वी, 21 डिसेंबर रोजी कादर खान यांनी अखेरचा श्वास घेतला होता. अभिनयापासून ते डायलॉग लिहिण्यापर्यंत, बॉलिवूडमध्ये 300 हून अधिक चित्रपटांसाठी काम करणाऱ्या कादर खान यांनी अजरा खानशी लग्न केले होते. त्यांना तीन मुलं आहेत, त्यापैकी अब्दुल कुद्दूस हा थोरला होता.
अभिनेता असल्याकारणाने कादर खानच्या घरात पहिल्यापासूनच अभिनयाचे वातावरण होते. लहानपणी जेव्हा त्यांचा मुलगा सरफराज टीव्ही बघायचा, तेव्हा त्याला वाटायचे की त्यानेही अभिनय केला पाहिजे. त्याच वातावरणात राहिल्यामुळे सरफराजने अभिनेता होण्याचा विचारही केला. पण सरफराजने आपल्या वडिलांना या स्वप्नाबद्दल कधीही सांगितले नाही. आपला कोणताही मुलगा अभिनेता व्हावा अशी इच्छा कादर खान यांना नव्हती.
तथापि, सरफराज खान चित्रपटांतून त्याची खास ओळख निर्माण करू शकला नाही. सरफराजने सलमान खानबरोबर ‘तेरे नाम’ आणि ‘वांटेड’ या चित्रपटात काम केले आहे. यानंतर सरफराज आता एक अॅक्टिंग अॅकॅडमी चालवित आहे, ज्यात तो नवीन मुलं-मुलींची अभिनय कार्यशाळा घेतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-धक्कादायक! अभिनेत्री किरण खेर देत आहेत कर्करोगाशी झुंज; ट्वीट करत अनुपम खेर यांनी दिली माहिती