Wednesday, June 11, 2025
Home बॉलीवूड ‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावरील धनश्री वर्माच्या डान्स व्हिडिओची सोशलवर धमाल, तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावरील धनश्री वर्माच्या डान्स व्हिडिओची सोशलवर धमाल, तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

लॉकडाऊन नंतर अनेक सेलेब्रिटींना भटकंतीचे वेध लागले आहे. सगळेच कुठे ना कुठे फिरायला जात असतानाची माहिती सोशल मीडियाद्वारे देत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री ‘धनश्री वर्मा’ ही आपला पती आणि क्रिकेटपटू ‘युजवेंद्र चहल’ याच्यासोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

मालदीवमधील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना धनश्री व्हिडिओ करणार नाही, असं होणारच नाही. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने समुद्र किनाऱ्यावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आता ट्रेंड असलेलं ‘डोन्ट रश चॅलेंज’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात तिने लाल रंगाचा शॉर्ट ड्रेस घेतला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत धनश्रीने कॅप्शन दिले आहे की, “आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट ठिकाण?? तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता का?? मी मालदीवच्या लोकांना हे चॅलेंज करायला भाग पाडलं???” यासोबतच तिने पुढे लिहिले की, हा व्हिडिओ चहलने शूट केला आहे.

या व्हिडिओला खूपच लाईक्स आणि कमेंट्स येत‌ आहेत. या सोबतच धनश्रीचा आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात ती समुद्रात काहीतरी क्रिएटिव्ह करताना दिसत आहे. यामध्ये ती आणि पती युजवेंद्र एकमेकांना प्रेमाची कबुली देताना दिसत आहे. त्या दोघांचे मागच्याच वर्षी म्हणजे 2020मध्ये लग्न झाले होते.

धनश्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच पंजाबी गायक ‘जस्सी गिल’ याच्यासोबत एका नवीन गाण्यात दिसणार आहे. खरंतर ती डॉक्टर आहे, परंतु तिला डान्सची प्रचंड आवड असल्याने ती वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

-पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नात श्रद्धाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा