चिरंजीवीची भाची निहारिका आहे ‘इतकी’ सुंदर की, बॉलीवूड अभिनेत्रीही पडतील तिच्यासमोर फिक्या


साउथ फिल्म इंडस्ट्री मधील सर्वात हँडसम अभिनेता म्हणून ‘वरून तेज’ या अभिनेत्याला ओळखले जाते. त्याच्या ‘फिदा’ या चित्रपटामुळे तो जास्त ओळखला जावू लागला. याच वरुन तेजच्या बहिणीचे नाव फार कमी चाहत्यांना माहीत असेल. तिचे नाव निहारीका कोनिडेला. निहारीकाने अनेक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. परंतू ती तेव्हाच लाईमलाईटमध्ये आली, जेव्हा तिचे नाव प्रभास सोबत जोडले गेले. बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देखील लाजवेल असे सौंदर्य निहारीकाकडे आहे.

आता निहारीका टॉलीवूडमधील नामांकित अभिनेत्रीपैकी एक आहे. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी फार मोठी आहे. तेलुगू सिनेमाचे अभिनेते आणि निर्माते नागेंद्र बाबू यांची ती कन्या आहे. तसेच सुपरस्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण यांची भाची आहे तर, प्रसिद्धीच्या झोतात आलेले अल्लू अर्जुन आणि राम चरण हे तिचे चुलत भाऊ आहेत. हे सर्व मोठे कलाकार.

बऱ्याच काळापासून निहारीकाचे नाव प्रभास सोबत जोडले जात होते. त्यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा सुद्धा समोर आल्या होत्या. परंतु या सर्व गोष्टी नाकारून निहारीकाने या अफवांवर पडदा टाकला होता आणि त्यावेळी फक्त मी माझ्या करियरवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले होते. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत चाहत्यांनी या अफवेवर विश्वास ठेवू नये असे तिने सांगितले होते.

९ डिसेंबर २०२० मध्ये निहारीकाने आपला प्रियकर चैतन्य जोनालगद्दा सोबत विवाह केला होता. निहारीकाचे हे लग्न डेस्टिनेशन वेडिंग असून जयपुरमधल्या उदय विलास पॅलेसमध्ये तिचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. ह्याच पॅलेसमध्ये मुकेश अंबानीची मुलगी इशा अंबानीच्या लग्नाच्या काही विधी पार पडल्या होत्या. असं म्हणतात की, जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेलचा ‘किताब या हॉटेलला मिळाला आहे. तिच्या या लग्नाला मोठमोठ्या दाक्षिणात्य कालकारांनी हजेरी लावली होती.

निहारीका ही आपल्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. लग्नानंतर आपली लाईफ ही चैतन्यसोबत मजेत घालवताना खूप वेळा सोशलद्वारे समोर आले आहे. आपले फोटो ती नेहमीच पोस्ट करून चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनत असते. तिचा पती हा व्यावसायिक आहे.

निहारीकाने तिच्या चित्रपट कारकीर्दीत आतापर्यंत फक्त पाच चित्रपट आणि तीन वेबसिरीज केल्या आहेत. तिने सुर्यकांतम, हॅपी वेडिंग, स्येरा नरसिम्हा यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. सोबतच ती निर्माती देखील आहे. तिने मूद्दापप्पू आणि नाना कुची यासारख्या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. पण सोशल मीडियावर तिची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर तिचे बारा लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.