काय सांगता राव? रवीना टंडनचा नवरा होता फराह खानचा ‘स्लीपिंग पार्टनर’! ‘या’ कारणामुळे दोघे झोपायचे एकाच बेडवर


असे म्हटले जाते की बॉलिवूडमध्ये कोणी कोणाचा मित्र, मैत्रीण नसते. इथे सर्व आपला स्वार्थ साधत असतो. पण खरंच असे असते का? बिलकुल नाही. आपण टीव्हीवर, सोशल मीडियावर अनेक जिवलग मित्रांची उदाहरणं पाहिली असतील. अनेक मुलाखतींमध्ये आपण मित्रांचे मजेदार, अनोखे किस्से ऐकलेच असतील. असाच एक रंजक किस्सा नुकताच कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने एका शोमध्ये सांगितला आहे.

हा किस्सा आहे फराह खान आणि रवीना टंडनचा नवरा अनिल थडानी यांचा. एका कार्यक्रमात फराह खान आणि रवीना टंडन पोहचले असताना फराहने एक किस्सा सर्वाना सांगितला. फराह खानने सांगितले की, “अनिल थडानी आणि ती एकेकाळी स्लीपिंग पार्टनर होते. ते फक्त फ्लाईटमध्ये एकत्र झोपायचे.”

फराहने सांगितले, “चुकीचा विचार करू नका. मी आणि अनिल खूप जवळचे मित्र आहोत. काही वर्षांपूर्वी एका विमान कंपनीची एक ऑफर आली होती, ज्यात जर कपल असेल, तर फर्स्ट क्लासच्या एका तिकिटावर एक सीट फ्री मिळायचे. आम्ही दोघे कपल बनून जायचो आणि एका तिकिटावर एक सीट फ्री घ्यायचो आणि एका बेडवर दोन्ही किनाऱ्यावर झोपायचो.”

या कार्यक्रमात फराहने तिचे बालपणीचे अनेक किस्से सांगितले. ती अनिल थडानीला ठड्डूमल म्हणत आवाज द्यायची. रवीनाबद्दल सांगताना तिने म्हणाली, “रवीनासाठी मुले वेडे होते. ती कॉलेजला असताना तिला अनेक प्रपोजल यायचे. रवीना कॉलेजला जीप चालवत जायची. त्याकाळी ओपन जीप मधून येणाऱ्या रवीनाला पाहून मुलं तिच्या मागे लागायची.”

फराहने आजपर्यंत अनेक मोठ्या सिनेमांसाठी कोरिओग्राफी केली आहे. शिवाय तिने अक्षय कुमार आणि शाहरुख खान सोबत काही सिनेमांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंजिनीअरिंग केल्यानंतर वळला होता मॉडेलिंगकडे, कष्ट करून मिळवली लोकप्रियता, वाचा संदीप नाहरचा संघर्षमय प्रवास
-‘आपण दोघी जॅकीसोबत लग्न करू आणि बहिणीसारख्या राहू’, जॅकी श्रॉफ यांच्या बायकोने त्यांच्या गर्लफ्रेंडला लिहिले होते पत्र, वाचा तो किस्सा
-ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल
-याला म्हणतात खरे प्रेम! ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने चाहत्याने उभारले ‘या’ अभिनेत्रीचे मंदिर, घातला दुधाने अभिषेक


Leave A Reply

Your email address will not be published.