Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

६६वा फिल्मफेअर पुरस्कार: ‘तान्हाजी’मध्ये बेस्ट ऍक्शन, तर ‘गुलाबो सिताबो’मधील संवादाने जिंकली चाहत्यांची मने

भारतातील तमाम सिनेप्रेमी ज्या पुरस्कारांची दरवर्षी मोठ्या आतुरतेने वाट पाहतात त्या फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाली आहे. ६६वा फिल्मफेअर पुरस्कार मुंबईत संपन्न होत असून संगीतकार प्रितमने लुडो सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार जिंकला आहे. दुसऱ्या बाजूला असिस कौरने मलंग सिनेमातील टायटल ट्रॅकसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा तर राघव चैतन्यने थप्पड सिनेमातील एक तुकडा धूप गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जिंकला आहे. याव्यतिरिक्त गुलाबो सिताबो या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेेत होते. त्यांच्या संवादाने सर्वांची मने जिंकली. याच संवादासाठी जुही चतुर्वेदीला सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बेस्ट पार्श्वगायक- राघव चैतन्य (थप्पड)
बेस्ट पार्श्वगायिका- आसीस कौर (मलंग)
बेस्ट डायलॉग- जुही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)
बेस्ट एडिटिंग- थप्पड
बेस्ट बॅकग्राउंड स्कोअर- थप्पड
बेस्ट ऍक्शन- तान्हाजी: द अनसंग वॉरिअर
बेस्ट म्युझिक अल्बम- ल्युडो
बेस्ट डेब्यू (फिमेल)- अलाया एफ (जवानी जानेमन)
बेस्ट डेब्यू डायरेक्टर- राजेश कृष्णन (लूटकेस)
बेस्ट ऍक्टर इन सपोर्टिंग रोल- सैफ अली खान, तानाजी द अनसंग वॉरियर

टेक्निकल पुरस्कार-
बेस्ट स्टोरी- 
अनुभव सिन्हा आणि मृण्मयी लागू (थप्पड)
बेस्ट स्क्रीनप्ले- रोहेना जेरा (सर)
बेस्ट डायलॉग- जूही चतुर्वेदी (गुलाबो सिताबो)
बेस्ट साऊंड डिझाईन- कामोद खराडे (थप्पड)
बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन- मानसी मेहता (गुलाबो सिताबो)
बेस्ट एडिटिंग- यशा रामचंदानी (थप्पड)
बेस्ट कॉस्च्युम डिझाइन- वीरा कपूर (गुलाबो सिताबो)
बेस्ट सिनेमॅटोग्राफी- अविक मुखोपाध्याय (गुलाबो सिताबो)
बेस्ट ऍक्शन- रमजान बुलूट, आरपी यादव (तान्हाजी: द अनसंग वॉरिअर)
बेस्ट कोरिओग्राफी- फराह खान (दिल बेचारा- दिल बेचारा)
बेस्ट बॅकग्राऊंड स्कोर- मंगेश धाकडे (थप्पड)
बेस्ट वीएफएक्स- प्रसाद सुतार (तान्हाजी: द अनसंग वॉरिअर)

विशेष पुरस्कार
आरडी बर्मन पुरस्कार- गुलजार

हे देखील वाचा