काळ नेहमीच बदलतो याची उदाहरणं आपण खूप पाहिली असतील. आज ज्या व्यक्तीला प्रसिद्धी नसते, तो पुढे जाऊन आपल्या कामगिरीच्या जोरावर पैसा, प्रसिद्धी या सर्व गोष्टी मिळवतो. असंच काहीसं टेलीव्हिजन क्षेत्रातही पाहायला मिळालं आहे. एक काळ होता, जेव्हा बॉलिवूड आणि टीव्ही मालिकेत काम करण्यात खूप फरक समजला जात असायचा. मोठ्या पडद्यावर काम करणारे कलाकार टीव्हीसारख्या छोट्या पडद्यावर काम करायला नको म्हणायचे.
परंतु जसा काळ बदलला तसा बॉलिवूड आणि टीव्ही मालिकेमधील असलेली दरी कमी झालेली पाहायला मिळाली आहे. आता यशस्वी कलाकारही टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहेत. टीव्हीवर काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्या बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील. त्यांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.
चला तर मग टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्यांची लोकप्रियता ही कोणत्याही यशस्वी सिने-अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
जेनिफर विंगेट
छोट्या पडद्यावर जेनिफर विंगेट हा चेहरा सर्वांच्या ओळखीचा आहे. ‘बेहद’ या मालिकेत तिने मायाची भूमिका साकारली होती. चाहत्यांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केले. याव्यतिरिक्त जेनिफरने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. जसे की, सरस्वतीचंद्र, दिल मिल गए, कहीं तो होगा आणि कुसुम या मालिंकामध्ये जेनिफरने काम केले आहे.
जेनिफर विंगेटला इंस्टाग्रामवर ९.५ मिलियन फॉलोवर्स आहेत.
हिना खान
बिग बॉस ११ ची फायनलिस्ट हिना खान यापूर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत दिसली होती. त्या ती अक्षराच्या भूमिकेत दिसली होती. ही मालिका चाहत्यांना भलतीच पसंत पडली होती. या मालिकेबरोबरच हिनाच्या चाहत्यांमध्येही चांगली वाढ झाली. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेनंतर हिनाने आपले पाऊल बिग बॉसच्या दिशेने टाकले. सध्या ती बिग बॉस १४ मध्ये सीनियर स्पर्धक आहे.
हिना खानला इंस्टाग्रामवर ९.७ मिलियन फॉलोवर्स आहेत.
दिव्यांका त्रिपाठी
दिव्यांका त्रिपाठी टीव्हीवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दिव्यांकाने ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत तिचे नाव इशिता होते. तर मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्याचे नाव करण पटेल होते. दिव्यांकाने अभिनेता विवेक दहियासोबत लग्न केले आहे.
दिव्यांका त्रिपाठीला इंस्टाग्रामवर १२.९ मिलियन फॉलोवर्स आहेत.
मौनी रॉय
‘नागिन’ या मालिकेने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. या मालिकेत मौनी रॉयने मुख्य भूमिका साकारली होती. यापूर्वीही मौनीने ‘महादेव’ आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकांमध्ये काम केले होते. मौनी वास्तव आयुष्यात आपल्या फॅशन सेंससाठी ओळखली जाते. ती एक चांगली डान्सरही आहे.
मौनी रॉयला इंस्टाग्रामवर १४.९ मिलियन फॉलोवर्स आहेत.
लहान पडद्याव्यतिरिक्त मौनीने बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबतच्या ‘गोल्ड’ चित्रपटात काम केले आहे. सोबतच ‘मेड इन चायना’ या चित्रपटातही ती दिसली आहे.