करोडो सब्सक्राइबर्ससह तुफान कमाई करणारे ‘टॉप ५’ भारतीय युट्यूब चॅनेल्स, १७ कोटी सब्सक्राइबर्ससह टी-सिरीज आहे अव्वल स्थानी


मंडळी सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे आणि या सोशल मीडियावर जर चलती कशाची असेल तर ती आहे व्हिडीओंची. व्हिडीओ, मग फोटो आणि शेवटी लिखीत कंटेंट असा चाहत्यांचा सोशल मीडियावर आवडी निवडी क्रम सहज आपल्या लक्षात येतो. यामुळे सोशल मीडियावर ज्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला हे व्हिडीओ पाहायला मिळतात, त्यात युट्यूब किंवा फेसबुक हे अव्वल क्रमांकावर आहेत.

याच युट्यूबवर जर तुमचे करोडो सब्सक्राइबर्स असतील तर? तर काय मंडळी हिट्स आणि पैसा दोन्हीतही तुम्ही अव्वल ठरणार. हे सब्सक्राइबर्स मिळतात तरी कसे? जर तुमच्या चॅनेलवर आलेला व्हिडीओ चाहत्यांना, मायबाप प्रेक्षकांना आवडला तर ते तुमचा चॅनेल सब्सक्राइबर्स करतात. गमतीचा भाग म्हणजे भारतात सर्वाधिक युट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्स लाभलेले पहिले ७ पैकी ७ चॅनेल हे एकतर मनोरंजन किंवा म्युझिकशी संबंधित आहेत. म्हणूनच ओरीजन कंटेंट निर्माण करुन भारतात काय जगात सर्वाधिक सब्सक्राइबर्स मिळवलेल्या भारतातील ५ चॅनेल्सबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (list of most-subscribed youtube channels in india)

टी सिरीज- 
भारतात काय जगात सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेला युट्यूब चॅनेल आहे टी-सिरीज. १७० मिलीयन म्हणजेच तब्बल १७ कोटी सब्सक्राइबर्स टी सिरीजला लाभले आहे. १३ मार्च २००६ रोजी टी-सिरीजने या चॅनेलची युट्यूबवर सुरुवात केली असून आजपर्यंत १५ हजारांच्या पुढे व्हिडीओ पोस्ट केले आहे. हे १५ हजार व्हिडीओ तब्बल १४१,३१४, ६६४, ७०२ थोडक्यात काय तर १४१३१ कोटी वेळा पाहिले गेले आहेत किंवा या व्हिडीओजला मिळून तेवढ्या हिट्स मिळाल्या आहेत. टी-सिरीजनंतर जगात सर्वाधिक सब्सक्राइबर्स लाभलेलं चॅनेल आहे PewDiePie. परंतू त्याच्या व टी-सिरीजच्या सब्सक्राइबर्समध्ये मोठं अर्थात ६२ कोटींचं अंतर आहे. २९ मार्च २०१९ रोजी टी-सिरीजने PewDiePieला मागे टाकत सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेलं चॅनेल होण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे टी-सिरीज युट्यूबर एखाद किंग्डमसारखं उभं आहे. अनेक नविन चित्रपटांची गाणी, ट्रेलर, अब्लममधील गाणी, सोलो गाणी या चॅनेलवरुन पोस्ट केली जातात.

सेट इंडिया-
भारतात सर्वाधिक सब्सक्राइबर्स लाभलेल्या दुसऱ्या चॅनेलचे नाव आहे सेट इंडिया. ९४.६ मिलीयन अर्थात ९.४६ कोटी सब्सक्राइबर्स या चॅनेलला लाभले आहे. जगात सर्वाधिक सब्सक्राइबर्स लाभलेल्या युट्यूब चॅनेलमध्ये सेट इंडिया चौथ्या स्थानी आहे. १० कोटी सब्सक्राइबर्स होण्यासाठी सेटला आता केवळ ५-६ कोटी सब्सक्राइबर्सची गरज आहे. सेटने युट्यूब चॅनेलची सुरुवात २१ सप्टेंबर २००६ रोजी केली असून तब्बल ४७ हजार ६२३ व्हिडीओ शेअर केले आहेत, जे टी-सिरीजपेक्षा तीन पटीने जास्त आहेत. त्यांच्या व्हिडीओला आतापर्यंत ७७,१४४,९३३,९५६ अर्थात ७७१४ कोटी व्हिव्ज किंवा हिट्स आल्या आहेत. या व्हिव्ज टी-सिरीजपेक्षा नक्कीच कमी आहेत. सेट इंडियावरुन चित्रपटांचे ट्रेलर, मालिकांचे कट्स, नविन-जुने गाणे पोस्ट केले जातात.

झी म्युझिक कंपनी-
भारतातील आघाडीची म्युझिक कंपनी असलेल्या झी म्युझिक ६ कोटी ८१ लाख सब्सक्राइबर्ससह भारतात तिसऱ्या तर जगात नवव्या स्थानी आहे. या चॅनेलची सुरुवात १२ मार्च २०१४ साली झाली असून सब्सक्राइबर्स मिळविँण्याचा याचा वेग इतरांपेक्षा जास्त आहे. आजपर्यंत चॅनेलवर ५ हजार २११ व्हिडीओ पोस्ट करण्यात आले असून त्याला एकूण ३३,८५१,५७८,४२० अर्थात ३३८५ कोटी व्हिव्ज किंवा हिट्स मिळाल्या आहेत. या चॅनेलवरुन नविन, जुने गाणे व चित्रपटांचे ट्रेलर पोस्ट केले जातात.

झी टिव्ही-
झी म्युझिक कंपनीनंतर भारतात चौथ्या स्थानी जर कोणता चॅनेल असेल तर तो आहे झी टिव्ही. झी टिव्हीवरील मालिकांचे कट्स किंवा संपुर्ण एपिसोड यावर पोस्ट केले जातात. महिला वर्गात हा चॅनेल अतिशय लोकप्रिय आहे. यावर कधी कधी मालिकांचे ट्रेलरही लॉंच केले जातात. ५ कोटी ६० लाख सब्सक्राइबर्ससह  हे चॅनेल जगातील सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेल्या चॅनेलमध्ये चौदाव्या स्थानी आहे. ११ डिसेंबर २००५ रोजी सुरु झालेल्या या चॅनेलवर आतापर्यंत ९७ हजार २८८ व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहे, जो एक विक्रम आहे. या चॅनेलला एकूण ५८,३३४,८५८,६४४ अर्थात ५८३३ कोटी व्हिव्ज किंवा हिट्स मिळाल्या आहेत.

गोल्डमाईन्स टेलेफिल्म्स-
सर्वाधिक सब्सक्राइबर्सलाभलेल्या भारतातील पहिल्या पाच युट्यूब चॅनेल्समध्ये गोल्डमाईन्स टेलिफिल्म्स (Goldmines Telefilms) पाचव्या स्थानी आहे. मनोरंजनाचा अतिशय चांगला कंटेंट पोस्ट करणारं चॅनेल म्हणून या चॅनेलकडे पाहिलं जातं. जगात सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेल्या चॅनेलमध्ये गोल्डमाईन्स टेलेफिल्म्स विसाव्या स्थानी आहे. २१ जानेवारी २०१२ रोजी सुरु झालेल्या या चॅनेलला ४ कोटी ८ लाख सब्सक्राइबर्स असून एकूण व्हिव्ज ११,६७७, ३४४, ५३५ अर्थात ११६७७ कोटी व्हिज किंवा हिट्स मिळाल्या आहेत. केवळ १ हजार ४८८ व्हिडीओ पोस्ट करत चॅनेलने एवढ्या सब्सक्राइबर्सचा टप्पा पार केला आहे. यावरुन स्पष्ट दिसते की तुम्ही किती व्हिडीओ पोस्ट करता यापेक्षा तुमचा कंटेंट किती चांगला आहे यावर तुम्हाला सब्सक्राइबर्स व हिट्स मिळतात. या चॅनेलवर बऱ्याच वेळा दक्षिण भारतातील सिनेमे हिंदीत डब करुन पब्लिश केले जातात. तसेच शनिवार चाहत्यांसाठी काही ना काही खास मेजवाणी असतेच. (5 most popular YouTubers in India)

या टॉप युट्यूब चॅनेलसह शेमारु फिल्मी गाणे (४ कोटी ७० लाख), सब टिव्ही (४ कोटी ४० लाख), सोनी म्युझिक इंडिया (४ कोटी १० लाख) आणि टी-सिरीज भक्ती सागर (३ कोटी ६० लाख) या चॅनेल्सलाही चांगले सब्सक्राइबर्स आहेत.

 


Leave A Reply

Your email address will not be published.