Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर करून मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने वेधलं चाहत्यांचं लक्ष, पाहा खास फोटोशूट

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सतत काही ना काही पोस्ट करून ती चाहत्यांचे मनोरंजन करते. एवढेच नव्हे, तर तिचे सुंदर व आकर्षक फोटो पोस्ट करून ती अवघ्या चाहत्यावर्गाचे लक्ष आपल्याकडे वेधत असते. काही दिवसांपूर्वीच महिला दिनानिमित्त, वेगवेगळ्या महिलांच्या कथा सांगणारे फोटो शेअर करून अभिनेत्री खूप चर्चेत झाली होती. खरंतर यात तिने कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या स्त्रियांची वेशभूषा करून, त्यांचे कौतुक केले होते. या कार्यासाठी तिचेही खूप कौतुक झाले होते.

नुकतेच प्रार्थनाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तिने कपाळावर छोटी टिकली लावून, गळ्यात एक नेकलेसही घातला आहे. यात प्रार्थनाचे सौंदर्य अगदी पाहण्यासारखे आहे. यापूर्वीही तिने साडीतील बरेच फोटो शेअर केले आहेत. वेस्टर्न प्रमाणेच प्रार्थना पारंपारिक लूकमध्येही उठून दिसते.

तिने शेअर केलेले हे फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच, कमेंट करत नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रार्थना बेहेरेने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय हिंदी मालिकेत वैशालीची भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली. पुढे ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

प्रार्थनाने ‘9 एक्स झकास हिरोईन हंट- सीझन 1’ चे विजेतेपदही पटकावले होते. यामुळे तिला, स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी अभिनित ‘मितवा’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त तिने ‘बॉडीगार्ड,’ ‘वजह तुम हो’ या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. प्रार्थना आता लवकरच ‘छूमंतर’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नाद करायचा न्हाय! सत्तरच्या दशकात ‘या’ अभिनेत्रींनी बिकिनी सीन्स देऊन केले होते सर्वांनाच चकित; हेलनचाही समावेश

-जुन्या आठवणी ताज्या करत नंदिता दासने शेअर केली पोस्ट, पाहा अभिनेत्रीचा ‘थ्रोबॅक’ फोटो, ओळखणेही झाले कठीण

-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड

हे देखील वाचा