मुकेश खन्नापासून ते एमएस धोनी; या ४ सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोवर येण्यास दिला होता नकार


कपिल शर्मा शो हा कार्यक्रम टीव्ही वर किती लोकप्रिय आहे हे वेगळं सांगायला नको. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम टीव्हीवरील सर्वात मनोरंजक कार्यक्रमांपैकी एक ठरला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींनी या शोवर येऊन कपिल शर्मा तिथल्या प्रेक्षकांशी संवाद साधला आहे. एकमेकांचे पाय खेचण्यापासून ते वेगवेगळे खुलासे करण्यापर्यंत या कार्यक्रमात अनेक गमतीजमती होत असतात.

वेगवेगळ्या कारणानिमित्त हा शो कायमच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे, मग तो कपिलचा भन्नाट अंदाज ते अर्चना पुरण सिंग यांच्या सेटवरील गमतीदार इंस्टाग्राम स्टोरीज. काही वर्षाच्या विरामानंतर ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आनंद हास्य आणि उल्हास घेऊन परतला.

हे सगळं असून सुद्धा, सर्वांच्या आवडीचा आणि नवीन चित्रपट किंवा वेबसीरीजसाठी प्रचार करायला एकमेव ठिकाण असताना देखील काही लोकप्रिय सेलिब्रिटींनी या शोचा भाग होण्यास नकार दिलाय.

पाहुयात कोण आहेत ते सेलिब्रिटीज

मुकेश खन्ना

या दिग्गज अभिनेत्याने नुकतेच द कपिल शर्मा शोमधल्या महाभारत विशेष भागातील अनुपस्थितीमागील कारण उघड केले. ते म्हणाले की हा विनोदी कार्यक्रम अतिशय खराब  आणि अश्लील असल्यामुळे मी या कार्यक्रमाचे आमंत्रण आल्याक्षणी नाकारले. एका प्रदीर्घ इंस्टाग्राम पोस्टमध्ये मुकेश खन्ना यांनी द कपिल शर्मा शोच्या विरोधात असलेल्या सर्व तक्रारींची नोंद देखील केली आहे.

या कार्यक्रमात सामील होण्यासाठीचे निमंत्रण नाकारण्याचे कारण सांगताना खन्ना म्हणाले, “कपिल शो देशभरात कितीही लोकप्रिय असला तरी मला या कार्यक्रमापेक्षा वाईट कार्यक्रम असल्याचे माहिती नाही. हा कार्यक्रम फालतूपणाने भरलेला आहे आणि दुहेरी अर्थ असलेल्या विनोदांनी भरलेला आहे आणि प्रत्येक क्षणाबरोबर अश्लीलतेकडे वळतो. यात पुरुष स्त्रियांचे कपडे घालतात, फालतू गोष्टी करतात आणि लोक पोट धरून हसतात.”

एमएस धोनी

विराट कोहली, हार्दिक पांड्या, युवराज सिंग, सुनील गावस्कर, हरभजन सिंग आणि कपिल देव यांच्यासारखे दिग्गज खेळाडू या कार्यक्रमाचा भाग होऊन गेले आहेत. मात्र, महेंद्रसिंग धोनीने या कार्यक्रमाचा भाग होण्यास नकार दिला होता. असे सांगितले गेले आहे की एमएस धोनीचे व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे बर्‍याच वेळा आमंत्रित करूनही तो या कार्यक्रमाचा भाग होऊ शकला नाही.

आमिर खान

असे नाही की आमीरला आमंत्रित केले गेले होते आणि तो काही कारणामुळे कार्यक्रमात येऊ शकला नाही. सुपरस्टार आमिर खान कोणत्याही कार्यक्रमाचा भाग होत नाही कारण त्याला आपला चित्रपट प्रमोट करण्यावर विश्वास नाही. त्याच्या इच्छेनुसार तो या कार्यक्रमाला हजेरी लावेल पण आजवर तीन खान पैकी शाहरुख आणि सलमान खानवगळता तो एकटाच आहेत ज्याने या कार्यक्रमाला भेट दिलेली नाही.

सचिन तेंडुलकर

महेंद्रसिंग धोनीनंतर सचिन तेंडुलकर हा आणखी एक दिग्गज क्रिकेटपटू आहे जो आपल्या व्यस्त कामकाजामुळे या कार्यक्रमाचा भाग झाला नाही. त्याचे भारतीय क्रिकेट संघाचे माजी संघ सहकारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी अनेकदा बोलावले असूनही सचिन व त्याची पत्नी अंजली या कार्यक्रमाला भेट देऊ शकले नाहीत.


Leave A Reply

Your email address will not be published.