Wednesday, January 21, 2026
Home अन्य अवघ्या ९ वर्षांच्या मुलाचे पायलट बनण्याचे स्वप्न राहुल गांधींनी २४ तासात केले पूर्ण, बॉलिवूड निर्मात्याने केली ‘अशी’ कमेंट

अवघ्या ९ वर्षांच्या मुलाचे पायलट बनण्याचे स्वप्न राहुल गांधींनी २४ तासात केले पूर्ण, बॉलिवूड निर्मात्याने केली ‘अशी’ कमेंट

मोठ- मोठे सेलिब्रिटी अनेकवेळा आपल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करताना दिसतात. यामध्ये नेतेमंडळींचाही समावेश होताना दिसतो. अशातच आता आणखी एक स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेस नेता राहुल गांधींनी एका 9 वर्षांच्या मुलाचे स्वप्न पूर्ण केले आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यावर बॉलिवूडमधील निर्मात्यानेही कमेंट केली आहे.

खरं तर त्या मुलाला पायलट व्हायचे होते आणि वयाच्या 9 व्या वर्षीच राहुल गांधींनी त्याचे स्वप्न पूर्ण केले. वास्तविक, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, चहाच्या दुकानात राहुल गांधींची भेट एका 9 वर्षाच्या मुलासोबत झाली. त्यांनी मुलाला विचारले की, त्याचे स्वप्न काय आहे. यावर मुलाने सांगितले की, ‘त्याला मोठे होऊन पायलट व्हायचे आहे.’

अशा परिस्थितीत, राहुल गांधींनी त्या मुलाचे स्वप्न अवघ्या 24 तासांत पूर्ण केले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे. आता यावर बॉलिवूड निर्माता परवेझ नुमारीनेही कौतुक करत कमेंट केली आहे.

हा व्हिडिओ राहुल गांधींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत 1 लाख 76 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींनी लिहिले की, “कोणतेही स्वप्न खूप मोठे नाही. अद्वैतचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही पहिले पाऊल उचलले आहे. आता असा समाज निर्माण करणे, अशी रचना करणे आपले कर्तव्य आहे, ज्यामुळे ते भरारी घेऊ शकतील.” त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत बॉलिवूड निर्माता परवेझ नुमरीने लिहिले की, “पंतप्रधानांसाठी राहुल गांधीच. पुढचे पंतप्रधान राहुल गांधी.”

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राहुल गांधी त्या मुलाशी बोलत आहेत. दरम्यान, राहुल गांधींनी मुलाला त्याच्या स्वप्नांबद्दल विचारले. यावर तो म्हणाला, “मला उड्डाण करायचे आहे आणि मी पायलट होण्याचे स्वप्न बघतो.” मुलाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, राहुल गांधींनी मुलाला आणि त्याच्या वडिलांना चार्टर्ड फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये आणण्याची व्यवस्था केली. यात एका बाजूला महिला पायलट विमान चालवताना दिसत आहे, तर राहुल गांधी मुलाला विमानाशी संबंधित गोष्टींबद्दल समजावताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जोडप्याच्या ‘बारिश की जाए’ गाण्यावरील डान्सने जिंकले सर्वांचे मन, गायक बी प्राकने शेअर केला जबराट व्हिडिओ

-नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

-‘मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे’, मास्क न लावल्यामुळे टीव्ही कलाकारांनी सुनावले कंगना रणौतला खडेबोल

हे देखील वाचा