याला म्हणतात दोस्ती! तब्बल पंचवीस वर्षांनी करण-अर्जुन चित्रपटातील ‘तो’ सीन पाहून शाहरुख-सलमान झाले भावुक


बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या लोकप्रिय होतात, त्यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतं. त्यामधील एक सगळ्यांची अत्यंत आवडती आणि लाडकी जोडी म्हणजे शाहरुख-सलमान खान. एकेकाळी एकत्र आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा ही जोडी आजही प्रेक्षकांसाठी तेवढीच खास आहे.

सलमान खान आणि शाहरुख खान यांनी ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. करण-अर्जुन या चित्रपटानेने तर त्यांना बॉलिवूडमधील भाऊ-भाऊ ही ओळख दिली मिळाली. करण-अर्जुन या चित्रपटातनंतर त्या दोघांचंही नाव प्रत्येकाच्या ओठावर असायचं. 13 जानेवारी 1995 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. 25 वर्ष झाले तरीही या चित्रपटावरचे प्रेक्षकांचे प्रेम आजही कमी नाही झाली. नुकताच शाहरुख खान आणि सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दोघेही करण-अर्जुन या चित्रपटातील एक सीन पाहून भावुक होत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे. सलामन आणि शाहरुखचा हा व्हिडीओ पंजाबी गायक ‘गुरु रंधवा’ याला खूपच आवडला. गुरुने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे आणि त्यावर असे लिहिले आहे की,” खूपच जबरदस्त व्हिडिओ आहे हा, असच नेहमी एकमेकांसोबत जगत रहा सर.”

या व्हिडीओमध्ये करण अर्जुन या चित्रपटातलं एक सीन आहे, जिथे त्यांची आई करण आणि अर्जुनला तिच्या हाताने घास भरवत असते. हा व्हिडीओ बघून त्यांच्या भूतकाळातील आठवणी समोर आल्या आणी ते दोघेही भावुक झाले.

सलमान खान आणि शाहरुख खान यांनी ‘कुछ कुछ होता है’, ‘करण अर्जुन’, ‘हम तुम्हारा हैं सनम’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. सलमान खान लवकरच’ राधे : योरं मोस्ट वॉन्टेड भाई’ आणि ‘अंतिम’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात ‘दीपिका पादुकोण’ ही मुख्य भूमिकेत असणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.