Tuesday, July 9, 2024

सुपरस्टार रजनीकांत यांना प्रतिष्ठित ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना मानाचा समजला जाणारा 51 वा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याची माहिती केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी (1 एप्रिल) दिली. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण पुढील महिन्यात ३ मे रोजी होणार आहे.

बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत स्टारडम स्थापित करणारे रजनीकांत, चाहते त्यांना ‘थलायवा’ म्हणतात. रजनीकांत हे प्रत्येक वेळी त्यांच्या चित्रपटांद्वारे नवीन विक्रम स्थापित करतात. त्यांना सन 2000 मध्ये भारत सरकारच्या वतीने ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरू येथे झाला. त्यांनी 1975 मध्ये ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर, त्यांनी ‘अंधा कानून’, ‘इंसाफ कौन करेगा’, ‘कबाली’ आणि ‘शिवाजी द बॉस’ यांसारख्या अनेक शक्तिशाली चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका निभावली.

महत्त्वाचे म्हणजे, 1985 मध्ये सुपरस्टार रजनीकांतने 100 चित्रपट पूर्ण केले. ‘श्री राघवेंद्र’ हा रजनीकांत यांचा 100 वा चित्रपट होता आणि यात त्यांनी हिंदू संत राघवेंद्र स्वामी यांची भूमिका केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ब्रेकिंग! प्रसिद्ध गायक बप्पी लहिरी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

हे देखील वाचा