रिललाईफमध्ये दीर-भावजयी, बहीण- भाऊ झालेल्या जोड्या रिअल लाईफमध्ये झाल्या पती-पत्नी, पाहा कोण आहेत ‘त्या’ जोड्या


असे म्हणतात की लग्नाची गाठ ही स्वर्गात बांधली जाते. इथे पृथ्वीवर आपल्याला फक्त आपला जोडीदार शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि डोळे उघडे ठेवावे लागतात. आपला जोडीदार आपल्याला कधी, कुठे, केव्हा मिळेल हे सांगता येत नाही. आता आपली मनोरंजन सृष्टी जर पाहिली तर या सृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत ज्यांना त्यांचा जोडीदार सोबत काम करत असतानाच गवसला.

टीव्हीवर चालणाऱ्या मालिका ह्या वर्षानुवर्षे चालतात, शिवाय मालिकांमध्ये अनेक कलाकार रात्रंदिवस सोबत काम करत असतात. त्यामुळे त्यांच्यात आपसूकच मैत्री निर्माण होते. पण काही कलाकारांच्या बाबतीत ही मैत्री थोडी पुढे जात प्रेमात सुद्धा बदलते. पडद्यावर वेगवेगळी नाते निभावणारे अनेक कलाकार खऱ्या आयुष्यात विवाह बंधनात अडकल्याची अनेक उदाहरणं आहेत. पडद्यावर बहीण – भाऊ, काका – पुतणी, दीर – भावजयी अशा अनेक भूमिका साकारणारे असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांशी लग्न केले आहेत. आज आपण या लेखातून अशाच काही जोड्या पाहणार आहोत. ज्यांनी रील लाईफ वेगळेच नाते निभावले मात्र रियल लाईफमध्ये ते विवाहित आहे किंवा रिलेशनशिपमध्ये आहे.

स्टार प्लसवरचा शो ‘गुम हैं किसीके प्यार मैं’ मध्ये पाखी आणि विराट यांच्या भूमिका निभावणारे मुख्य कलाकार ‘ऐश्वर्या शर्मा’ आणि ‘निल भट्ट’ यांनी नुकताच साखरपुडा केला आहे. या मालिकेत हे दोघं दीर आणि भावजयी असे नाते निभावत असून प्रत्यक्ष आयुष्यात मात्र हे दोघं लवकरच लग्न करणार आहेत.

स्टार प्लसचा सुपरहिट शो ‘ये हैं मोहब्बतें’ हा आता जरी बंद झाला असला तरी या शो मुळेच एक लोकप्रिय आणि सुपरहिट जोडी तयार झाली आहे. या शो मध्ये मुख्य भूमिका करण पटेल (रमण भल्ला) आणि दिव्यांका त्रिपाठी (इशिता भल्ला) यांनी साकारली होती. मात्र या शो मध्ये खऱ्या आयुष्यात दिव्यांकाने या शो मधल्या विवेक दहियासोबत लगीन गाठ बांधली आहे.

कलर्स चॅनेलचा हिट शो उतरनने देखील एक लोकप्रिय जोडी बनवली होती. या शोमध्ये मुख्य भूमिका साकारणारे रश्मी देसाई आणि नंदिश सिंधू यांनी भलेही जिजा- साली अशी भूमिका साकारली असली तरी त्यांनी प्रत्यक्षात लग्न केले होते, पण दुर्दैवाने त्यांचे हे नाते जास्त काळ चालले नाही.

महेश शेट्टी आणि अनिशा कपूर ही जोडी घर एक सपना या मालिकेच्या सेटवर तयार झाली. आधी भेट, मग मैत्री आणि नंतर प्रेम असा त्यांच्या प्रेमाचा प्रवास झाला, आणि त्यांनी एकमेकांना जोडीदार म्हणून निवडले.

यश टौंक आणि गौरी यादव ही जोडी काही किसी रोज या मालिकेच्या दरम्यान तयार झाली. रिलमध्ये दीर-भावजयी असे नाते निभावणारे हे दोघं रियल लाईफ नवरा बायको असून, दोन मुलींचे आई, बाबा आहेत.

शपथ या सिरीयलमध्ये अमन वर्मा आणि वंदना ललवानी हे दोघे बहीण- भाऊ हा रोल करत होते, मात्र अमन यांना वंदना आवडल्या आणि वंदना यांना देखील अमन आवडले पुढे या दोघानी लग्न देखील केले.

कहाणी घर घर की या जबरदस्त हिट शो देखील अशीच जबरदस्त जोडी बनवली आहे. या शो मध्ये बहीण भाऊ साकारणारे रिंकू धवन आणि किरण करमरकर हे मालिकेदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि यांनी लग्न केले, मात्र २०१७ साली लग्नाच्या १५ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला.


Leave A Reply

Your email address will not be published.