Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

अभिनेत्री मंदिरा बेदीचा जन्म 15 एप्रिल 1972 रोजी झाला होता. मंदिरा बेदी ही अशी अभिनेत्री आहे, जिचे वयानुसार सौंदर्यही वाढतच चालले आहे. मंदिराची फिटनेस आजकालच्या नव्या अभिनेत्रींना मात देईल असाच आहे. तिच्याकडे पाहता कोणीही असे म्हणू शकत नाही की, ती 51 वर्षांची आहे. मंदिरा त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित केले आहे. अभिनेत्रीसोबतच टीव्ही सादरकर्ता अर्थात अँकर म्हणूनही ती खूप यशस्वी झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिरा बेदीने 1994 मध्ये दूरदर्शनचा अतिशय प्रसिद्ध शो ‘शांती’ पासून तिच्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या लोकप्रिय मालिकेत तिच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. ही एक दीर्घकाळ चालणारी मालिका होती. ‘शांती’ अशी मालिका मानली जाऊ शकते, जिने केबलच्या युगातील स्त्रियांवर आधारित डेली सोपची पायाभरणी केली. यातील तिच्या लूकबद्दल सतत चर्चा होत असे. ‘शांती’ व्यतिरिक्त मंदिरा ‘आहट’, ‘औरत’, ‘घर जमाई’, ‘सास भी कभी बहु थी’ या प्रसिद्ध मालिकेचा भाग राहिली आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे, आधुनिक ड्रेस असो किंवा पारंपारिक साडी, प्रत्येक ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते.

क्रिकेटप्रेमी मंदीरा बेदीला जेव्हा चाहत्यांनी क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटचे बारकाईने विश्लेषण करताना पाहिले, तेव्हा तिची नवीन स्टाईल पाहून ते खूप आश्चर्यचकित झाले. मंदिरा तिच्या फिटनेसबाबत खूप सावध आहे. आपले फिजीक अर्थात शरिरयष्टी राखण्यासाठी, मंदिरा बेदीने लग्नाच्या सुमारे १२ वर्षानंतर मुलाला जन्म दिला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये तिने चार वर्षांची लहान मुलगी तारा दत्तक घेतली होती. मंदिराने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी जेव्हा ३९ वर्षांची होते तेव्हा मी मुलाला जन्म दिला. मला भीती होती की, मी गरोदर राहिल्यास माझी कारकीर्द संपेल.” मंदिरा तिची तंदुरुस्ती टिकवण्यासाठी खूप मेहनत घेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

मंदिरा बेदीने बराच काळ क्रिकेट सामन्यांसाठी टीव्ही सादरकर्ता म्हणून काम केले आहे. साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये तिचा ग्लॅमरस लुक खूप चर्चेत राहायचा. टीव्हीसोबतच मंदिराने बॉलिवूडमध्ये तिच्या कारकिर्दीची सुरूवात ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या हिट चित्रपटाद्वारे केली होती. चित्रपटांव्यतिरिक्त मंदिराने वेब सिरीजमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट यांचा अविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध फॅशन डिझायनरचे दुःखद निधन

जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत शाहरुख खानला स्थान, ऑस्कर विजेत्या राजामौलीचा देखील समावेश

हे देखील वाचा