Wednesday, July 3, 2024

दिग्दर्शक एस. शंकर यांची मुलगी चढली बोहल्यावर; ‘या’ क्रिकेटरशी बांधली तिने लगीनगाठ

भारतात आता जरी कोरोनाची दुसरी लाट कमजोर पडत असली, तरी सरकारने अजूनही लॉकडाऊनचे नियम शिथिल केले नाहीत. याचे कारण म्हणजे भारत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा असल्याने, सरकार पूर्ण खबरदारी घेऊन पावले टाकत आहे. मात्र असे असूनही मनोरंजनाच्या क्षेत्रात लग्नसराई जोरदार सुरु असल्याचे आपल्याला दिसत आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरे होणारे हे सर्व लग्न अतिशय सध्या आणि खासगी समारंभात संपन्न होत आहेत. टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कोरोना काळात लगीनगाठ बांधली आहे.

या यादीत अजून एका नावाची आता भर पडली आहे आणि ते नाव आहे, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रतिभावान दिग्दर्शक एस. शंकर यांची मुलगी ऐश्वर्या आणि क्रिकेटर रोहित दामोदर यांचं. रविवारी (२७ जून) रोजी चेन्नईमध्ये अतिशय दिमाखदार सोहळ्यात एका रिसॉर्टमध्ये या दोघांनी अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थित लग्न केले आहे. या दोघांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांना त्यांच्या या नवीन आयुष्यासाठी फॅन्ससोबतच कलाकार आणि खेळाडूंकडूनही शुभेच्छा येत आहेत.

ऐश्वर्या ही दिग्दर्शक एस. शंकर यांची सर्वात मोठी मुलगी असून, ती व्यायसायाने डॉक्टर आहे. तर रोहित हा तामिळनाडूचे प्रसिद्ध उद्योगपती दामोदरन यांचा मुलगा असून, तो तामिळनाडू प्रीमियर लीगच्या टी-२० स्पर्धेतील मदुराई पँथर्स संघाचा मालक आहे. देशात कोरोना महामारी असल्यामुळे सर्वच पाहुणे मास्क आणि विशिष्ट अंतर पाळताना दिसले. या लग्नाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी देखील हजेरी लावली होती. या दोघांच्या वेषभूषेबद्दल सांगायचे झाले, तर दोघांनी पारंपरिक वेषभूशा परिधान केली होती.

रोहितबद्दल सांगायचे झाले. तर त्याने आतापर्यंत ५१ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तर टी २० सामन्यांमध्ये त्याने २,५०६ धावा काढल्या आहेत. मात्र असे असूनही अद्याप त्याला भारतीय क्रिकेट किंवा आयपीएलमध्ये स्थान मिळालेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्ट लवकरच होणार कपूर घराण्याची सून?? नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर रंगल्या चर्चा

-‘बाळाचे प्लॅनिंग करेल तेव्हा सर्वात आधी मीडियाला सांगेल’; प्रेग्नेंसीबाबत अफवांवर ‘देसी क्वीन’ सपना चौधरीने दिली प्रतिक्रिया

-यामी गौतमने ‘या’ व्यक्तीला म्हटले तिच्या आयुष्यातील ‘वन मॅन आर्मी’; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

हे देखील वाचा