Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड गोड जोडपं! बॉबी अन् तान्याच्या लग्नाला २५ वर्षै पूर्ण; अभिनेत्याने पत्नीला ‘या’ शब्दात दिल्या शुभेच्छा

गोड जोडपं! बॉबी अन् तान्याच्या लग्नाला २५ वर्षै पूर्ण; अभिनेत्याने पत्नीला ‘या’ शब्दात दिल्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो प्रत्येक दिवशी त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो. या वेळेस देखील त्याने त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याच्या सोबत एक खास व्यक्ती दिसत आहे. ती व्यक्ती म्हणजे त्याची पत्नी तान्या देओल आहे. रविवारी (३० मे) बॉबी देओल आणि तान्या देओल यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. ते दोघे 30 मे, 1996 रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्याने सोशल मीडियावर त्यांचे सुंदर फोटो शेअर केले आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडत आहे.

बॉबी देओलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तान्या देओलसोबत काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामधील काही फोटो त्यांच्या लग्नाचे आहेत. हे फोटो शेअर करून तो त्याच्या आयुष्यातील या 25 वर्षांना उजाळा देत आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, बॉबी आणि तान्या एकमेकांच्या प्रेमात मग्न झाले आहेत. हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “माझं मन, माझा आत्मा. तू माझ्यासाठी माझं जग आहेस. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहील, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.”

बॉबीची ही पोस्ट खूप वेगाने व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार देखील त्यांच्या या फोटोला प्रतिक्रिया देऊन शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे त्याची पत्नी तान्याला बघून सगळे हैराण झाले आहेत. सगळ्यांचे असे म्हणणे आहे की, तान्या ही कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. एका युजरने लिहिले आहे की, “तान्या किती सुंदर आहे ना.”

बॉबी देओलची पत्नी चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. पण सौंदर्यच्या बाबतीत ती सगळ्या अभिनेत्रींना मागे सारेल. तान्या एक व्यावसायिक आहे. ती एक इंटेरियर डिझायनर आहे. ती खास करून फर्निचर डिझाईन करते. तान्याने ‘जूर्म’ आणि ‘जैसलमेर’ या चित्रपटात कॉस्च्युम डिझायनर म्हणून देखील काम केले आहे. तान्याला सोशल मीडियापासून लांब राहायला आवडते. त्यामुळे त्यांचे फोटो आजपर्यंत जास्त कोणाला दिसले नव्हते. बॉबी आणि तान्या एक यशस्वी जोडपे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा