स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत तिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. अभिनयासोबतच तिने तिच्यातील एक लहान मुलं जिवंत ठेवले आहे आणि याचं निरागसतेमुळेचं तिच्या अभिनयाचा प्रवास इथपर्यँत आला आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकने ती नेहमीच प्रेक्षकांना तिच्याकडे आकर्षित करत असते. अशातच तिचा एक मराठमोळा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
मृण्मयीने तिच्या सोशल अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाची काठाची साडी परिधान केली आहे. यासोबत तिने ऑक्साईड ज्वेलरी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे. तिचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत आहेत. तसेच हा फोटो मोठ्या संख्येने शेअर केला जात आहे. तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे. तिच्या फोटोवर सध्या कौतुकाचा वर्षाव चालू आहे. (mrunmayee deshpande share her cute saree photo on social media )
मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहित ठरले आहेत. ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ या सारख्या चित्रपटात काम केले आहे. तिने झी मराठीवरील ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘अग्निहोत्र’ आणि ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या झी मराठीवरील ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. तिची बहीण गौतमी देशपांडे ही देखील एक अभिनेत्री आहे. ती देखील झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट
-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन