Thursday, November 13, 2025
Home मराठी उफ ब्युटी! घायाळ करणाऱ्या अदांनी ईशा केसकरने चोरली चाहत्यांची मने, बॉयफ्रेंडही म्हणतोय की…

उफ ब्युटी! घायाळ करणाऱ्या अदांनी ईशा केसकरने चोरली चाहत्यांची मने, बॉयफ्रेंडही म्हणतोय की…

टेलिव्हिजनवर कलाकार जी भूमिका निभावतात, तिच भूमिका आयुष्यभरासाठी त्यांच्या नावी होऊन जाते. मग ती नायकाची भूमिका असो किंवा खलनायकाची. प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. पण एका नायकाच्या भूमिकेतून थेट खलनायकाच्या भूमिकेत कलाकारांना स्वीकारण्यास प्रेक्षक काचकूच करतात. पण काही कलाकार असे असतात, जे प्रत्येक भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावतात. याला साजेसे असे उदाहरण म्हणजे अभिनेत्री ईशा केसकर. झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत बानूचे पात्र निभावून तिने प्रेक्षकांच्या मनात तिची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. पण त्यानंतर तिने काही दिवस ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया हे पात्र निभावले होते. पण या ग्लॅमरस भूमिकेत देखील प्रेक्षकांनी तिला खूप लवकर स्वीकारले होते. ईशा तिच्या खऱ्या आयुष्यात देखील ग्लॅमरस आहे. तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

ईशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा लूक पाहण्यासारखा आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि काळ्या रंगाचा स्लिव्हलेस टॉप परिधान केला आहे. यासोबत तिने पिवळ्या रंगाचे कोट खांद्यावर घेतला आहे. तसेच पिवळ्या रंगाचे कानातले घातले आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने बोल्ड पोझ देत हे फोटोशूट केले आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. तसेच फोटोवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

तिच्या फोटोवर तिचा बॉयफ्रेंड ऋषी सक्सेना याने देखील कमेंट केली आहे. त्याने “ओह” असे लिहून फायर इमोजी पोस्ट केली आहे. तसेच ऋतुजा बागवे हिने देखील कमेंट केली आहे. तसेच अनेक चाहते देखील या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा चालू आहे. (marathi actress isha keskar’s glamrous photo viral on social media)

ऋषी सक्सेना आणि ईशा मागील अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ऋषीने या आधी ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले आहे. या मालिकेत त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत सायली संजीव होती. या मालिकेतील त्यांची जोडी खूप प्रसिद्ध झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा