Tuesday, August 5, 2025
Home मराठी व्हाइट हुडी अन् डोक्यावर कॅप! चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय रसिकाचा ‘हटके’ अंदाज

व्हाइट हुडी अन् डोक्यावर कॅप! चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय रसिकाचा ‘हटके’ अंदाज

आपल्या शनाया या चंचल, नटखट आणि बिनधास्त पात्राने आख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील तिच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. खलनायकाच्या भूमिकेत असूनही तिने सर्वांना तिच्या प्रेमात पाडले होते. प्रेक्षक तिचा द्वेष करत असले, तरी प्रेक्षकांना ती तेवढीच हवीहवीशी वाटत होती. या मालिकेत तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता, तरी देखील प्रेक्षकांनी तिला नव्याने स्वीकारली होती. शनाया जेवढी मस्तीखोर होती तेवढीच रसिका देखील मस्तीखोर आहे. याची प्रचिती आपल्याला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून येतच असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रसिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत मस्तीच्या अंदाजात दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रसिकाने पांढऱ्या रंगाची हुंडी आणि शॉर्ट्स घातले आहेत. तिने अत्यंत मजेशीर अंदाजात पोझ दिल्या आहेत.

तिचा नटखट अंदाज प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडला आहे. सगळेजण तिला कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. या आधी देखील आपल्याला रसिकाचे असे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून रसिका तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलगी याच्यासोबत केलेल्या फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. त्या दोघांनीही अत्यंत बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी रसिकाने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. तेव्हा आदित्यने तिचे स्केच काढून तिला गिफ्ट दिले होते. हे फोटो देखील रसिकाने शेअर केले होते. (marathi actress rasika sunil’s funny photo viral on social media )

रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने याआधी ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘गंमत’, ‘गर्लफ्रेंड’, ‘बस स्टॉप’, ‘पोस्टर गर्ल’ या चित्रपटात काम केले आहे. रसिका स्कुबा ड्रायव्हर आणि पायलट देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा