Saturday, March 15, 2025
Home मराठी जेव्हा अचानक विराजस कुलकर्णीने धरला शिवानी रांगोळेचा गळा; व्हायरल फोटोवर मोठ्या प्रमाणात उमटतायेत प्रतिक्रिया

जेव्हा अचानक विराजस कुलकर्णीने धरला शिवानी रांगोळेचा गळा; व्हायरल फोटोवर मोठ्या प्रमाणात उमटतायेत प्रतिक्रिया

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक कपल आहे. त्यातील नेहमीच चर्चेत असणारे कपल म्हणजे अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे. या दोघांची जोडी अत्यंत मजेशीर आणि रोमँटिक आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. त्यांचे हटके फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत असतात. अशातच त्यांचा एक मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराजसने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शिवानीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, विराजसने शिवानीचा गळा धरला आहे. पण त्यांनी या फोटोत अत्यंत मजेशीर अंदाजात पोझ दिली आहे. त्यांचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खास पसंत पडला आहे. हा फोटो शेअर करून त्याने एक कॅप्शन देखील दिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लग जा गले.”

यामध्ये विराजसने गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तसेच शिवानीने मल्टी कलरचा टॉप परिधान केला आहे. हा फोटो शिवानीने देखील याच कॅप्शनसहित पोस्ट केला आहे. त्यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण या फोटोवर कमेंट करून त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत. तसेच त्याच्या या मस्तीवर हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. (virajas kulkarni share a funny photo with shivani rangole on social media )

विराजस आणि शिवानी मागील अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. ते दोघेही कलाकार आहेत. विराजस सध्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मुख्य भूमिकेत आहे. तर शिवानी सध्या स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आहे. विराजस आणि शिवानीने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नात एकत्र हजेरी लावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा