Monday, July 1, 2024

हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूडमधील मलायका अरोरा प्रमाणे दिसणारी अभिनेत्री आणि डान्सर म्हणजे हीना पांचाळ. तिने मराठी ‘बिग बॉस २’ मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून प्रवेश केला होता. या नंतर ती खूप चर्चेत आली होती. ती दर दिवशी तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बिग बॉसमध्ये असताना तिची मस्ती आणि भांडण खूप चर्चेत आले होते. तसेच शोमध्ये तिचा वर्कआउट आणि डान्स देखील प्रेक्षकांनी पाहिला आहे. अशातच तिने तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती जोरदार लटके झटके मारताना दिसत आहे.

हीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका म्युझिकवर जोरदार डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. नेहमी प्रमाणे तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. याआधी देखील तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. आताही तिच्या या व्हिडिओला चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी हीना पांचाळ हिला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होते. मित्राच्या घरात पार्टी दरम्यान पोलिसांनी हीना सहित अनेक लोकांना नाशिकमध्ये अटक केले होते. (marathi bigg boss fame actress heena panchal share her dance video on social media )

हीना पांचाळ हिने हिंदी तसेच मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. तिने अनेक आयटम साँग देखील केले आहेत. ती मराठी ‘बिग बॉस २’ मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आली होती. या शोनंतर तिला खुप लोकप्रियता मिळाली. ‘मुझसे शादी करोगी’ या रियॅलिटी शोमध्ये देखील ती सामील झाली होती. हीना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ ती अनेकवेळा शेअर करत असते. बिग बॉसनंतर तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा