Monday, July 1, 2024

स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मालिका. दिवसभराच्या ओढाताणीत संध्याकाळी एकत्र कुटुंबासोबत बघितलेल्या मालिका काही वेगळीच ऊर्जा देतात. त्या मालिकेतील प्रत्येक पात्र हे आपल्या कुटुंबातील एक भाग वाटू लागतो. अशीच सध्या चर्चेत असणारी मालिका म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला.’ ही मालिका प्रेक्षकांना खास पसंत पडत आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यात असणारी आर्थिक आणि वैचारिक दरी या मालिकेतून स्पष्ट होत आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमचे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेत ही पात्रं अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर निभावत आहेत.

मालिकेत त्यांचे प्रेम लग्नापर्यँत पोहचतंय की नाही, हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्याच सध्या मालिकेत असा ट्रॅक सुरु आहे की दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांच्या विरोधामुळे आणि ओमची बहीण मालविका हीच्यामुळे होणारा त्रास पाहून ओम आणि स्विटूने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रॅकमुळे त्यांच्या चाहत्यांनाही वाईट वाटत आहे. पण त्यातच आता मालिकेच्या सेटवरील काही फोटो व्हायरल होत आहे, ज्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्वीटूने छान साडी घातली आहे, तर ओम अगदी फॉर्मल ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच ओमच्या कपाळावर कुंकू लावलेले असून, स्विटूही सुंदर दिसत आहे. हे फोटो पाहून चाहत्यांनी असा अंदाज वर्तवला आहे की मालिकेत लवकरच ओम आणि स्विटू यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरु होईल.

त्यांच्या एका फॅन अकाउंटवर हा फोटो शेअर करून त्यांनी “राणी मी तू राजा” असे कॅप्शन दिले आहे. त्यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना आवडला तर आहे, पण सगळे या फोटोवर कमेंट करून मालिकेत ते दोघे लग्न करणार आहे का? अशी विचारणा करत आहेत. (anvita faltankar and shalv kinjawadekar photos, fans think they are getting married)

https://www.instagram.com/p/CSOzFB6KbJb/

ओम आणि स्वीटू हे दोघे झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय जोडपे आहे. प्रेक्षक त्यांना खूप प्रेम देतात. अन्विताने या आधी ‘गर्ल्स’ या चित्रपट काम केले आहे. तसेच तिने ‘टाईमपास’ या चित्रपटात केतकी माटेगावकर हिच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती. शाल्वने देखील अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘हंटर’, ‘मेड इन हेवन’, ‘बकेट लिस्ट’, ‘एक सांगायचंय’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कंटेस्टंटचा परफॉर्मन्स पाहून दलेर मेहंदी रडले ढसाढसा; भाऊ मिका सिंगने मारली मिठी; पाहून तुमचेही डोळे पाणावतील

-मुंबई पोलिसांकडून शर्लिन चोप्राची ८ तास चौकशी; राज कुंद्रावर लावले होते लैंगिक अत्याचाराचे आरोप

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा