Wednesday, August 6, 2025
Home मराठी स्वागत स्त्री जन्माचे! गायिका सावनी रवींद्रला कन्यारत्न प्राप्त

स्वागत स्त्री जन्माचे! गायिका सावनी रवींद्रला कन्यारत्न प्राप्त

या वर्षी चंदेरी दुनियेत अनेक कलाकारांच्या घरात पाळणा हलला आहे. मराठी तसेच बॉलिवूडमधील अनेक घरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशातच मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीची गायिका सावनी रवींद्र हिला कन्यारत्न प्राप्त झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता सावनीच्या घरात देखील चांगलेच हर्षाचे वातावरण असणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, गायिका सावनी रवींद्र आणि डॉक्टर आशिष धांडे यांच्या जीवनात एका नवीन पाहुण्याचे आगमन आले आहे. या गोष्टीची माहिती गायिकेने अजूनही अधिकृत केलेली नाही. परंतु सर्वत्र तिच्या घरी आलेल्या एका लहान परीची चर्चा चालू आहे. याआधी सावनीने मे महिन्यात पहिल्यांदा ती प्रेग्नेंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर तिने तिच्या डोहाळेजेवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. आता ही बातमी ऐकून तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत. सर्वजण तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन करत आहेत. (singer savani ravindra give birth to baby girl)

सावनी ही प्रेग्नेंसी दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. ती नेहमीच तिचे फोटो आणि गाण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होती. त्यामुळे तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

सावनी ही संगीत क्षेत्रातील एक आघाडीची गायिका आहे. तिने राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवला आहे. ती नेहमीच संगीत क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करत असते. तिने मराठीसह हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली आणि कोकणी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तिचे केवळ भारतातच नव्हे, तर जगभर नाव पसरले आहेत. त्यामुळे तिच्या चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा