सध्या सर्वत्र टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे वातावरण आहे. या वर्षी ही स्पर्धा चांगलीच जोरदार चालू आहे. शनिवारी (७ ऑगस्ट) भारताचा नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक भारताच्या नावी केले आहे. हा भारतासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. त्याच्या या कार्याचे भारतातील प्रत्येकाला कौतुक तसेच अभिमान आहे. यानिमित्त संपूर्ण भारत आनंद साजरा करत आहे. चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकरांना देखील त्याच्या या कार्याचा अभिमान वाटत आहे. त्यामुळे सगळे त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.
बॉलिवूडमधील तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. यात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने ट्वीट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे की, “टोकियो ऑलिम्पिकमध्ये यश मिळवल्याबद्दल नीराज चोप्रा तुझे खूप अभिनंदन. तुझ्या या यशाने तू तुझ्या आई वडिलांची आणि भारताची मान गर्वाने उंचावली आहे. या क्षणी मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाही.”
Congratulations Neeraj Chopra on your win at the Tokyo Olympics. More power to you! You’ve made your parents & India ???????? proud. Can’t tell you how happy I am. This is awesome ????#NeerajChopra #TokyoOlympics pic.twitter.com/mx45Otodwo
— Ajay Devgn (@ajaydevgn) August 7, 2021
यासोबतच अभिनेता इम्रान हाश्मी याने देखील ट्वीट केले आहे की, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे.”
Wow !! take a bow @Neeraj_chopra1 .. this is HISTORIC !! ???????????? pic.twitter.com/rBTistlLvM
— Emraan Hashmi (@emraanhashmi) August 7, 2021
तसेच अभिनेत्री यामी गौतम हिने देखील अभिनंदन केले आहे. तिने लिहिले आहे की, “अभिनंदन आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटत आहे.”
Thrilled to see #TeamIndia win another #Bronze Medal! #BajrangPunia, congratulations! You've done us all proud. ????????#TokyoOlympics2020 #Cheer4India pic.twitter.com/xOVHPSobWC
— Yami Gautam Dhar (@yamigautam) August 7, 2021
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी याने देखील ट्वीट केले आहे की, “गोल्ड, कायमचे ऋणी.” यासोबत त्याने नीरजचे आभार देखील मानले आहेत.
GOLD !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Thank u #NeerajChopra !!!
Forever indebted !!!!!!!!!!!!!!!!!!! #Tokyo2020 pic.twitter.com/KeiMFZLlJf— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) August 7, 2021
तसेच रवीना टंडन आणि वरुन धवन यांनी देखील ट्वीट करून त्याचे अभिनंदन केले आहे. (neeraj chopra win gold medal in javelin throw in olympic, actors give best wishesh)
GOLD it is. Neeraj chopra is a legend pic.twitter.com/IIEZYtLFlp
— VarunDhawan (@Varun_dvn) August 7, 2021
All teared up ! What a moment ???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????? https://t.co/0KLkqZUxx0
— Raveena Tandon (@TandonRaveena) August 7, 2021
नीरज चोप्राने भाला फेकीच्या पहिल्या टप्यात तीन फेकींमध्ये अनुक्रमे ८७.०३, ८७.५८, ७६.८२ मीटर अंतरावर भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या टप्यातील पहिल्या दोन फेकींमध्ये नीरज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. पण त्याने आपलं सुवर्ण पदक दुसऱ्याच फेकीत निश्चित करू ठेवलेलं होतं. ते अंतर कोणताच खेळाडू पार करू शकला नाही. अखेर नीरज चोप्राच्या ८७. ५८ मीटर फेकीसाठी त्याला सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्ण पदक आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण
-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा
-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल