Saturday, June 29, 2024

अभिनेता रोनित रॉयने महामारीमधील वाईट दिवसांचा केला खुलासा; म्हणाला, ‘अक्षय कुमार- अमिताभ बच्चन यांनी…’

कोरोना काळात सगळा देश जेव्हा लॉकडाउन होता, तेव्हा सामान्य जनतेसोबत कलाकारांना देखील अनेक बिकट परिस्थितीतून जावे लागले आहे. बॉलिवूड अभिनेता रोनित रॉय याला देखील या बिकट आर्थिक परिस्थितीतून जावे लागले आहे. रोनित हा एस सिक्युरीटी नावाची एक सिक्युरिटी एजन्सी चालवत आहे. जी अनेक प्रसिद्ध लोकांना बॉडीगार्ड उपलब्ध करून देते. रोनितने नुकतेच खुलासा केला आहे की, त्याने कोरोना महामारीमध्ये अनेक ग्राहक गमावले होते. त्याने सांगितले की, या कठीण प्रसंगात अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी त्याला साथ दिली होती. तेव्हा तो त्याची ही कंपनी बंद करण्याचा विचार करत होता.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एक मुलाखतीत रोनितने सांगितले की, “त्याने मार्च २०२० मधील लॉकडाऊननंतर त्याची सिक्युरिटी एजेन्सी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने कर्मचाऱ्यांना रोस्टरवर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्या सगळ्यांना वैयक्तिक कारणांसाठी पैशाची गरज होती. त्याने सांगितले की, त्याचे अनेक ग्राहक त्याला सोडून गेले होते. लॉकडाऊनमध्ये केवळ अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार त्याच्यासोबत होते आणि तो त्यांचा आभारी आहे. (actor ronit roy remembered the bad days in the pandemic said only akshay kumar and amitabh bachchan supported him)

रोनितने पुढे सांगितले की, जेव्हा परत काम सुरु झाले तेव्हा त्याने ११० कर्मचाऱ्यांना ड्युटीवर पुन्हा येण्यासाठी सांगितले होते. पण त्यातील ४० जणांनी परत येण्यासाठी नकार दिला दिला होता. कारण त्यांना त्यांच्या घरून परत यायचे नव्हते. कर्मचाऱ्यांची उदासीनता लक्षात घेऊन एजन्सीच्या संचालन पद्धतीत बदल केला होता. मग त्याने पुन्हा नव्याने काम सुरु केले आणि आता रोस्टरमध्ये कोणीच नाहीये. त्याने कर्मचाऱ्यांचे पेमेंट करण्यासाठी दुसरा पर्याय निवडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

 

हे देखील वाचा