Monday, October 7, 2024
Home मराठी जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसतीये रूपवती, सोनाली कुलकर्णीच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसतीये रूपवती, सोनाली कुलकर्णीच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अनेक बोल्ड, साध्या आणि डॅशिंग भूमिका साकारून आख्या महाराष्ट्राला तिच्या अभिनयाच्या प्रेमात पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. मराठी चित्रपटसृष्टीत तिची ‘अप्सरा’ सोनाली अशी ओळख झाली आहे. कारण ‘नटरंग’ चित्रपटातील तिची भूमिका आणि डान्स एवढा अप्रतिम होता की, या चित्रपटात ‘अप्सरा आली’ या गाण्यामुळेच तिची सर्वत्र ओळख निर्माण झाली. सोनाली ही अभिनयासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच सोनालीने तिच्या चाहत्यांसाठी साडीमधील काही फोटो शेअर केले आहे. ज्यात ती नेहमी प्रमाणेच सुंदर दिसत आहे.

सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने जांभळ्या रंगाची आणि सोनेरी काठ असलेली एक साडी नेसली आहे. यावर तिने मिसमॅच असा हिरव्या रंगाचे स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे. यावर तिने कोणतीही ज्वेलरी परिधान केली नाही. तिने केवळ इअरिंग्ज घातले आहेत. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहे. यामध्ये तुम्ही शकता की, सोनालीने अगदी हलकासा मेकअप केला आहे.

तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. हे फोटो शेअर करून केवळ काही तास झाले आहेत, पण आतापर्यँत या फोटोला २२ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (sonalee kukarni share her saree photos on social media)

नुकतेच काही दिवसांपूर्वी सोनाली तिच्या पतीसोबत मालदीवला फिरायला गेली होती. तेथील अनेक फोटो ती दररोज शेअर करत होती. यातील मालदीव बीचवरील तिचा बिकिनी फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ट डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वीटू-ओमचं लवकरच होणार लग्न? ‘त्या’ फोटोमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण

-कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

-हीना पांचाळचे ठुमके पाहून हरपले चाहत्यांचे भान; भन्नाट डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा