अमीर खान अभिनेता 3 इडियट्स हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामुळे यातील अनेक कलाकारांनी लोक ओळखू लागले. तसेच या चित्रपटानंतर अनेक कलाकारांनी उत्तम काम देखील मिळाले. तसेच या चित्रपटातील अगदी छोट्या छोट्या पात्र ज्यांनी केले त्या व्यक्तींनाही आजपर्यंत लोक विसरू शकले नाही. आसाच या चित्रपटाचा चाहता म्हणजे भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा असलेल्या अभिषेक शर्मा. अलीकडेच अभिषेकने सांगितले की, 3 इडियट्स हा त्याचा आवडता चित्रपट आहे. आणि तो म्हणाला कि हा चित्रपट अनेकदा पाहिले असले तरीही, तो पाहताना त्याला कधीच कंटाळा येत नाही.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका पुरस्कार वितरण समारंभादरम्यान अभिषेक शर्माने ही माहिती दिली. गेल्या वर्षभरात भारताने जिंकलेल्या ICC ट्रॉफींचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, क्रिकेटपटूंसोबत एक मजेशीर “रॅपिड-फायर” फेरी घेण्यात आली. या सत्रादरम्यान जेव्हा अभिषेकला त्याच्या आवडत्या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने लगेच 3 इडियट्स हे नाव घेतले.
3 इडियट्स हा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला आहे. राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित तर विधू विनोद चोप्रा यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात शिक्षण पद्धतीतील त्रुटींवर प्रभावीपणे भाष्य करण्यात आले आहे. तसेच केवळ घोकंपट्टी करण्यापेक्षा ज्ञानार्जनाला दिले जाणारे महत्त्व, मैत्रीचे अतूट नाते अत्यंत सुंदररीत्या मांडण्यात आले आहे. तुम्हाला जर 3 इडियट्स हा चित्रपट पाहायचा असेल, तर तो नेटफ्लिक्सवर, आणि इतर प्लेटफॅर्मवर उपलब्ध आहे. तसेच, YouTube वरही पाहु शकता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
करीना कपूरचा ‘3 इडियट्स’ मधील मंगेतर सुहास आठवतोय? आता पूर्ण बदलंय रूप, वेगळ्या अंदाजात जगतोय आयुष्य










