Saturday, March 2, 2024

‘3 इडियटस’पासून ‘डंकी’पर्यंत राजकुमार हिरानीने केली 300 कोटींचा आकडा पार;सेट केला माइलस्टोन

राजकुमार हिरानीने प्रत्येक वेळी त्यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. हीरानींचं नाव त्या मोजक्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जातं,ज्यांच्या नावावर फक्त हिट सिनेमेच आहेत. ते एक असे निर्माते आहेत जे नेहमी त्यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांची योग्य नस पकडतात. त्यांचे चित्रपट हे आरशासारखे समाजाला प्रतिबिंब दाखवण्याचे काम करतात. नुकताच त्यांचा डंकी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच मन जिंंकलं आहे. तर त्याचवेळी त्यांच्या चित्रपटांनी जागतिक बाॅक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा पार करत एक मायलस्टोन गाठला आहे.

राजकुमार हिरानीचे कोणते चित्रपट झाले हिट
हिरानींनी चित्रपटसृष्टीला उत्कृष्ट असे अनेक चित्रपट दिले आहेत.त्यांच्या चित्रपटांनी बाॅक्स ऑफिससोबतंच लोकांच्या मनावरही राज्य केलं आहे.

 • डंकी (dunki)
  डंकीमधून राजकुमार हिरानीने खरोखरीच हृदयाला भिडणारी कथा मांडली आहे. या चित्रपटात मैत्री आणि देशप्रेम या विषयांना खुप सुंदर पद्धतीने मांडले आहे.या चित्रपटातून राजकुमार हिरानीने पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत(shah rukh khan) काम केले आहे. ही फिल्म जवळजवळ 460 करोडचं जबरदस्त कलेक्शन करत बाॅक्स ऑफिसवर राज्य करत आहे.
 • 3 इडियटस (3 idiots)
  2009मध्ये आलेल्या 3इडियटस या आयकाॅनिक चित्रपटाला कोण विसरु शकतं?.आमिर खान(amir khan), करीना कपूर खान, शरमन जोशी आणि आर माधवन स्टारर या चित्रपटाने लोकांचं मन जिंकलं होतं. आजही लोक या चित्रपटाला आवडीने पाहतात. या फिल्मने जगभरातून 400 कोटींचं कलेक्शन करुन ग्लोबल बाॅक्स ऑफिसवर धमाका केला होता.
 • पीके(pk)
  2014मध्ये राजकुमार हिरानीने पीके चित्रपटातून प्रेक्षकांंसमोर एक अदभुत कहानी मांडली होती.खरंतर त्यावेळी ही कथा अगदीच नवीकोरी आणि ताजी होती. या चित्रपटात आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, बोमन ईरानी, ​​सौरभ शुक्ला आणि संजय दत्त यांसारखे कलाकार होते. या चित्रपटाने जगभरात 770 कोटींची कमाई केली होती.
 • संजू (sanju)
  संजय दत्तची बायोपिक संजू बाॅक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. या बायोपिकमध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची मुख्य भुमिका पार पाडली होती. या चित्रपटाने जगभरात 586 करोडपेक्षा जास्त कमाई करुन बाॅक्स ऑफिसवर जोरदार धमाका केला होता.

हे देखील वाचा