Friday, December 5, 2025
Home साऊथ सिनेमा पुनीत राजकुमाराच्या निधनानंतर झालेल्या अन्ना संथारपने कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती

पुनीत राजकुमाराच्या निधनानंतर झालेल्या अन्ना संथारपने कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती

कलाकार आणि त्यांचे फॅन्स हे हे वेगळेच समीकरण आहे. कलाकार म्हटले की त्यांना फॅन्स असणारच ते सर्वश्रुत आहेत. कलाकरांना देखील फॅन्सचे त्यांच्या प्रेमाचे वेगवेगळे अनुभव येत असतात. मात्र या सर्वांमध्ये खऱ्या अर्थाने फॅन्सने संपन्न अशी इंडस्ट्री म्हणजे दाक्षिणात्य इंडस्ट्री. या क्षेत्रात कलाकारांना देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिर उभारण्यापर्यंत त्यांच्यावर प्रेम केले जाते. बऱ्याचदा आपण दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांच्या अशा प्रेमाची विविध उदाहरणं पाहत असतो, ऐकत असतो. आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करण्याची तयारी असलेले अशा स्वरूपाचे फॅन्स मिळणे म्हणजे कलाकारांचेच सौभाग्य समजले पाहिजे. नुकतेच कन्नड अभिनेता पुनीत राजकुमाराचे निधन झाले. खूपच कमी वयात पुनीतची अशी एक्सिट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली.

पुनीतला जाऊन ११ दिवस झाले असले तरी त्याचे फॅन्स अजूनही या धक्क्यातून सावरले नाहीत. ९ नोव्हेंबर रोजी पुनीतच्या परिवाराने अन्ना संथारपने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत तिथे प्रसादाचे सेवन केले. या कर्यक्रमाच्या वेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पहिले तर नजर जाईल तिथपर्यंत लोकांची रांग दिसते आणि नंतर व्हिडिओमध्ये प्रसादात सामील होणारे त्याचे चाहते दिसत आहे. यावरूनच कर्नाटकमधील लोंकांचे पुनीतवर केवढे प्रेम होते हे दिसत आहे.

पुनीत राजकुमाराच्या अंत्यसंस्कारानंतर तिथे रोज हजारो लोकं भेट देत त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. पुनीत राजकुमाराचे २९ ऑक्टोबर रोजी हृदय विकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्याच्यावर राजकीय सन्मान देत ३१ ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार केले गेले. एका मोठया वृत्तपत्राच्या माहितीनुसार ३१ ऑक्टोबरनंतर दररोज जवळपास ३० हजार लोकं त्याच्या स्मारकाला भेट देत आहेत.

पुनीतच्या स्मारकाजवळ ३०० पेक्षा अधिक कर्नाटक राज्याचे राखीव पोलीस आणि बंगलोर शहरातील पोलीस तैनात केले आहे. हे पोलीस जवळपास १२ तास ड्युटी करत आहे. या स्मारकाला भेट देण्यासाठी सकाळी ९ ते ६ परवानगी देण्यात आली आहे.

येत्या १६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण सॅंडलवूड इंडस्ट्री पॅलेस ग्राऊंमध्ये पुनीतला श्रद्धांजली देणार आहे. या कार्यक्रमाला पुनीत नमन हे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला फक्त कुटुंबातील लोकं आणि इंडस्ट्रीमधील काही लोकांना परवानगी देण्यात आली आहे. हा कार्यक्रम टीव्हीवर देखील दाखवला जाणार आहे. पुनीत राजकुमारच्या मृत्यूची बातमी ऐकून ७ लोकांना हृदयविकाराचा झटका आला तर तीन लोकांनी आत्महत्या करत त्यांचे डोळे दान केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

शूटिंगच्या सेटवरच जिवंत जळाली होती ‘ही’ अभिनेत्री, वाचा एका माचिसच्या काडीने कसा घेतला जीव

अल्लू अर्जुन अडकला अडचणीत, अपमानकारक जाहिरातीमुळे तेलंगणा सरकार पाठवणार नोटीस

ट्रान्सजेंडरची भूमिका निभावून मिळवली ओळख, पहिल्याच भेटीतच आशुतोष राणांच्या नजरेत भरली होती रेणुका शहाणे

हे देखील वाचा