Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

पिवळ्या साडीत कमालीची सुंदर दिसतेय ऋतुजा बागवे; घायाळ करणाऱ्या नजरेवर चाहते झाले फिदा

मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे ही तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे खूप चर्चेत असते. तसेच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून देखील बऱ्यापैकी चर्चेत असते. खरंतर ऋतुजाचा समावेश मराठी इंडस्ट्रीमधील अत्यंत सोज्वळ अभिनेत्रींमध्ये होतो. तिचा हा सोज्वळ आणि साधेपणा तिच्याकडे पाहता क्षणीच प्रेक्षकांच्या ध्यानात येतो. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते. अलीकडेच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्या लूकमध्ये ती अत्यंत साधी, पण तेवढीच सुंदर दिसत आहे.

ऋतुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच साडीला मॅचिंग असा पिवळ्या रंगाचा बलून स्लिव्हस ब्लाउज परिधान केला आहे. तसेच तिने यावर चॉकलेटी रंगाची ज्वेलरी घातली आहे. या फोटोमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कोणतीही गोष्ट सोप्पी नसते. त्यासाठी तुम्हाला कणखर व्हावे लागते.” तिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. फोटोवर सातत्याने कमेंटचा वर्षाव होत आहे. तिच्या या फोटोवर अभिनेता सुबोध भावेने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. (rutuja bagwe share her simple saree look photo on social media)

यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा