बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांसोबत तो अभिनेत्री मलायका अरोरासोबत असलेल्या रिलेशनमुळे खूप चर्चेत आहे. मागील अनेक वर्षांपासून ते दोघे रिलेशनमध्ये आहेत. अशातच त्यांचे चाहते आता हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, ते दोघे लग्न करणार आहेत की नाही? आणि जर करणार आहेत तर तो शुभ प्रसंग कधी येणार आहे. पण यात अर्जुन कपूर काही नाराज दिसत आहे. तो माध्यमात आलेल्या वृत्तामुळे खूप नाराज झाला आहे. माध्यमातील वृत्तातनुसार, मलायका अरोरा त्याच्यापेक्षा जास्त कमावते.

माध्यमातील या वृत्ताने तो खूप नाराज झाला आहे. त्याने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “२०२१ मध्ये ही हेडलाईन वाचणे खूप दुःखदायक आहे. यामध्ये काही प्रश्न नाही की, ती चांगलं कमावते आणि इथंपर्यँत येण्यासाठी तिने अनेक वर्ष काम केले आहे. याची कोणासोबतच तुलना नाही होऊ शकतं.” माध्यमांनी असे सांगितले होते की, मलायकाची कमाई १०० कोटी आहे. तर अर्जुन कपूरची कमाई ८८ कोटी आहे. असे देखील सांगितले होते की, मलायका एका आयटम सॉन्गसाठी १.७५ कोटी रुपये एवढी रक्कम घेते. (arjun kapoor furious over comparison with malaika aroras earnings said sad and shameful)

अर्जुन कपूर आणि मलायका यांच्यातील बॉन्डिंग जबरदस्त आहे. ते अनेकवेळा एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. त्यांचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका मुलाखतीत मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनबाबत सांगितले होते की, “माझे लग्न तुटल्यानांतर मला अजिबात या गोष्टीचा अंदाज नव्हता की, मी पुन्हा एकदा रिलेशनमध्ये येईल. मला माझ्या आयुष्यात प्रेम पाहिजे होते. या नवीन नात्याने मला माझा आत्मविश्वास पुन्हा मिळाला. मी खूप खुश आहे.” अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघे त्यांच्या रिलेशनमुळे खूप ट्रोल झाले आहेत. त्यांच्या वयातील अंतरामुळे ते दोघे अनेकवेळा ट्रोल होत असतात. मलायका ही अर्जुनापेक्षा खूप मोठी आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…










