बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही सध्या चित्रपटसृष्टीमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. जान्हवीने खूप कमी कालावधीत तिचे नाव कमावले आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे हॉट आणि बोल्ड फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिची एक वेगळीच स्टाईल पाहायला मिळत आहे.
व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवीने यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती पॅपराजींना पोझ देताना दिसत आहे. पॅपराजी तिला जान्हवी मॅम म्हणून आवाज देतात आणि पोझ देण्यासाठी सांगतात. ती देखील त्यांना पोझ देते आणि काही वेळानी बाय म्हणून तेथून निघून जाते. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे. सगळेजण तिच्या या व्हिडिओचे आणि तिच्या ड्रेसचे कौतुक करताना दिसत आहेत. (janhvi kapoor’s video viral on social media)
जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २०१८ मध्ये ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती लवकरच ‘गुड लक जेरी’ या चित्रपटात दिसणार आहे. या आधी ती शेवटची ‘रुही’ या चित्रपटात दिसली होती. ती करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. तसेच ती ‘तख्त’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी
-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…










