Thursday, January 15, 2026
Home मराठी ‘मेरे खयालों की मलिका!’ गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये सोनाली कुलकर्णीचे मनमोहक रूप

‘मेरे खयालों की मलिका!’ गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये सोनाली कुलकर्णीचे मनमोहक रूप

मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. तिने तिच्या डान्सने आणि अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे. तिच्या घायाळ करणाऱ्या अदा सर्वांनाच आवडतात. अशातच तिचा आजकाल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर असतो. सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोंनी नुसता धुमाकूळ घातला आहे. ती एका नंतर एक असे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच ती तिचा पती कुणालसोबत मालदीवला गेली होती. तेथील अनेक फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केले होते. अशातच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती गजब सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. स्लिव्हलेस ब्लाउज आणि स्कर्टमध्ये तिचे सौंदर्य खुलले आहे. यामध्ये तिने कोणतीही ज्वेलरी परिधान केलेली नाही. केवळ हातात एक ब्रेसलेट घातले आहे. तसेच ती तिच्या ओढणीसोबत पोझ देताना दिसत आहे.

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकरांना देखील आवडला आहे. तिच्या या फोटोवर डान्सर फुलवा, सुयश टिळक आणि शिवानी बावकर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच तिचा हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (marathi actress sonalee kulkarni’s pink colour lehenga photos viral on social media )

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ट डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा